मुंबई - विक्रोळी पार्क साईड रोड नंबर एक येथील बीएमसी कॉलनी परिसरात रुग्णालय बांधण्यात येत आहे. या रुग्णालयाचे भूमिपूजन नगरसेविका ज्योती हारून खान यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेकडून उभारण्यात येत असलेले हे रुग्णालय सात माळ्यांचे राहणार आहे. रुग्णालयात डायलिसिस, एमआरआईसी, सिटी स्कैन, प्रसूतीगृह यासह इतरही सुविधा राहणार आहेत.
मुंबईत सध्या कोरोनाचा प्रभाव कायम आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड्स मिळत नाही. त्यामुळे मृत्यूसंख्येतही वाढ होत आहे. पालिकेकडून शहरात विविध ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. तरीसुद्धा काही ठिकाणी रुग्णांची आणि नातेवाईकांची अडचण होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने विक्रोळी येथील बीएमसी कॉलनी परिसरात रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. सर्व सोयी-सुविधायुक्त असे सात माळ्यांचे हे रुग्णालय राहणार आहे. रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन नगरसेविका ज्योती हारून खान यांच्या हस्ते करण्यात आले.