ETV Bharat / city

आश्चर्यचकीत झालात..! हे कुठले लोकल रेल्वेचे स्टेशन नाही, तर मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरचे आहे दृष्य - मुंबई विमानतळ

खरं तर विमानतळावर तुरळक गर्दी व शिस्तीचे वातावरण असते. मात्र आज मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी होती. आतमध्ये चेंगराचेंगरी होत होती व सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, प्रवाशांनी उड्डाण चुकल्याबद्दल व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

airport
airport
author img

By

Published : Oct 8, 2021, 3:29 PM IST

Updated : Oct 8, 2021, 3:43 PM IST

मुंबई - मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज गोंधळाचे वातावरण आहे. दुर्गा पूजेला घरी जाणाऱ्या लोकांमुळे विमानतळावर मोठी गर्दी जमली आहे. यावेळी विमानतळ गर्दीच्या रेल्वे स्टेशनसारखे दिसत आहे.
मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे, जिथे आज सकाळी एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले.

मुंबई विमानतळावरील गर्दीचे दृष्य

खरं तर विमानतळावर तुरळक गर्दी व शिस्तीचे वातावरण असते. मात्र आज मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी होती. आतमध्ये चेंगराचेंगरी होत होती व सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, प्रवाशांनी उड्डाण चुकल्याबद्दल व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. असे सांगितले जात आहे की, विमानतळावर लोक लांब रांगेत अडकले होते. दुसरीकडे, देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी पुरेसा वेळ देण्यासाठी लवकर चेक इन करण्याचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा - जेएनपीटी बंदरातून आलेल्या कंटेनरवर DRI चा छापा; 125 कोटींचे हेरॉईन जप्त

मुंबई विमानतळावरील सूत्रांचे म्हणणे आहे की, "सणासुदीमुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विमानतळ प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत, कारण आम्ही आमच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही ढिलाई घेऊ शकत नाही. सुरक्षिततेमुळे गर्दी वाढली आहे. तपास करून आम्ही लवकरच निवेदन जारी करू.

Last Updated : Oct 8, 2021, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.