ETV Bharat / city

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आगीचा भडका, एक कार जळून खाक - A fire broke out on the Mumbai-Pune Expressway

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे'वर मुंबई लेनला रात्री आगीचा थरार पहायला मिळाला आहे. काही वेळाच्या अंतरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. एक डस्टर कार जाळून खाक झाली, तर दुसऱ्या घटनेत बल्कर ट्रकचे टायर जळाले. या आगीच्या थरारत दैव बलत्तर म्हणून कारमधील चार जणांचा जीव वाचला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आगीचा झाला भडका, एक कार जळून खाक

author img

By

Published : Oct 8, 2021, 10:59 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे'वर मुंबई लेनला रात्री आगीचा थरार पहायला मिळाला आहे. काही वेळाच्या अंतरात आगीच्या दोन घटना घडल्या आहेत. एक डस्टर कार जाळून खाक झाली, तर दुसऱ्या घटनेत बल्कर ट्रकचे टायर जळाले. या आगीच्या थरारत दैव बलत्तर म्हणून कारमधील चार जणांचा जीव वाचला.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर आगीचा भडका, एक कार जळून खाक

दैव बलत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी नाही

पहिली घटना घडली किलोमीटर 34. 400 येथे (7 ऑक्टोबर 2021)रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास (MH 48 A T 1366)या डस्टर मेक कारने अचानक पेट घेतला आणि ती काही वेळात जळून खाक झाली आहे. दैव बलवत्तर म्हणून त्या प्रलयामध्ये कारमध्ये प्रवास करणाऱ्यांना 4 जणांना काही इजा झाली नाही. कार चालकाला आग लागल्याचा अंदाज येताच त्याने कार थांबवल्याने सर्वजण बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आय. आर .बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट आणि डेल्टा फोर्सचे जवान तेथे दाखल झाले.

डेल्टा फोर्सचे जवान दाखल झाले

दरम्यान, येथे दुसरी घटनाही मुंबई पुणे एक्स्प्रेस वे'वर मुंबई लेनला घडली (7 ऑक्टोबर 2021)रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास (MH 48 A T 1366)क्रमांकाची डस्टर मेक कार जळून खाक झाली. त्याचा धुर हवेत विरतो न विरतो तोच किलोमीटर 33.99 वर मुंबई लेनला सिमेंट वाहून नेणाऱ्या बल्करच्या उजव्या बाजूच्या मागील टायरना लायनर जॅम झाल्याने आग लागली. या घटनेची माहिती मिळताच आय. आर. बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट आणि डेल्टा फोर्सचे जवान तेथे दाखल झाले.

...त्यामुळे मोठा अनर्थ टळला

येथील उतारावर बहुतांशी वाहने इंधन वाचवण्यासाठी न्युट्रल पद्धतीने चालवली जातात. गियर कंट्रोल करण्या ऐवजी वारंवार ब्रेक लावल्याने लायनर गरम होऊन जॅम होतात. त्यामुळे टायर फिरणे बंद होऊन रस्त्या सोबत घर्षणाने हीट जनरेट होते आणि आग लागते. असाच, काहीसा प्रकार सिमेंट बल्करच्या बाबतीत घडला असावा. मात्र, लागलीच मदत पोचल्याने जवानांनी पाण्याचा मारा करून आग विजवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा - नियमाने जे काही असेल ते जनतेसमोर येईल... घाबरायचे काहीही कारण नाही - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.