ETV Bharat / city

Aarey Metro Carshed Case: आरे मेट्रो कारशेड प्रकरण! पर्यावरण प्रेमींच्या विरोधात गुन्हा दाखल - आरे मेट्रो कारशेड

राज्यात सत्ता परिवर्तनानंतर पुन्हा एकदा आरे मेट्रो कारशेड वरून पर्यावरण प्रेमी आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. ( Aarey Metro Carshed Case ) आरे मेट्रो कारशेड मध्ये 19 पर्यावरण प्रेमी विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अद्याप यामध्ये पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही. या संदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात देखील पोहोचलेला आहे.

आरे मेट्रो कारशेड
आरे मेट्रो कारशेड
author img

By

Published : Jul 29, 2022, 4:15 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांनी आरे मेट्रो कारशेडशी संबंधित 2 गुन्हे दाखल केले आहे पहिला एफआयआर (FIR) 3 पर्यावरण प्रेमी विरोधात आहे जे बेकायदेशीर रित्या आरे मेट्रो कारशेड आले होते. ( Aarey Metro car shed case ) ज्यांनी कारशेड परिसरात बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा गुरुवारी रात्री निदर्शने करणाऱ्यांविरुद्ध आहे. 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे.

पर्यावरण प्रेमींसह मुंबईकरांनी तीव्र विरोध - आरेतील मेट्रो कारशेड हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. मात्र, सेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरेमधील कारशेडवरील बंदी उठवली. त्यामुळे आरेमध्ये कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. शिंदे सरकारच्या या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमींसह मुंबईकरांनी तीव्र विरोध दर्शवला. आरे परिसरात निदर्शने, आंदोलने केली. दुसऱ्याच दिवशी पोलीसांनी आंदोलकांना हुसकावून लावले. तसेच, मोठ्या बंदोबस्तात आरेतील वृक्षतोड सुरू केली. या वृक्षतोडीचे पडसाद मुंबईत उमटत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी - आरेला मुंबईचे फुफ्फुस समजले जाते. १८०० एकर जंगल पसरले आहे. अनेक वन्यजीव प्राणी या जंगलात वावरताना दिसतात. मात्र, आरेमध्येच मेट्रोचे कारशेड उभारणीचे काम सुरू झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून रात्रभर जागर आंदोलन करण्यात आले. हातात आरे वाचवा, आरेची काळजी अशा आशयाचे फलक घेऊन मुंबईसह पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी घातली असताना, आरेमधील वृक्षतोड होत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तसेच, मुंबईकरांसाठी आरे वाचले पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.

आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला आव्हान - शहराच्या विविध भागातून लोक निषेधाच्या ठिकाणी येत आहेत. मात्र, पोलीस नोटीस बजावण्यासाठी आंदोलकांची नावे आणि पत्ते विचारत असल्याची अमृता भट्टाचार्य या आंदोलक तरुणीने दिली. नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख आणि विविध गटांचे नेतृत्व करणारे लोक निदर्शने करण्याच्या परवानगीसाठी पोलिसांकडे येत आहेत. परंतु, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती पोलीस उपायुक्त झोन 12 सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

आंदोलकांविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल - कलम 149 अंतर्गत जारी केले आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे कोर्टात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी सांगितले. दरम्यान, आरे मेट्रो कारशेड मध्ये बेकायदेशीर रित्या प्रवेश करणाऱ्या आणि दिनांक 28 रोजी रात्री आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंदोलन प्रेमी शोधण्याचे काम सुरू आहे अशी माहिती सोमनाथ घार्गे डीसीपी झोन 12 यांनी दिली आहे.

हेही वाचा - Pravin Darekar : 'संजय राऊतांनी पक्षाचा कोसळणारा डोलारा थांबवण्यासाठी तोंडाला...'; प्रवीण दरेकरांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.