ETV Bharat / city

धक्कादायक; बीकेसी कोविड सेंटरमध्ये तीन आठवड्यात 91 मृत्यूची नोंद

author img

By

Published : Aug 19, 2020, 6:56 PM IST

mumbai
बीकेसी कोविड सेंटर

मुंबई - कोविड रुग्णांवर आता मुंबईतील चार मोठ्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचे सेंटर असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन आठवड्यात येथे 91 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर बीकेसी कोविड सेंटरमधील मृत्यूदर मुंबई महापालिकेच्या कोविड रुग्णालयापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता पालिकेने याची गंभीर दखल घेत यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सेंटरला दिले आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बीकेसी सुमारे 2 हजार बेडचे कोविड सेंटर बांधण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेडही असून काही दिवसांपासून गंभीर रुग्णांवर ही उपचार येथे केले जात आहेत.

आतापर्यंत या सेंटरमधून शेकडो रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सेंटर सुरू झाल्यापासून येथे एकही रूग्ण दगावला नव्हता. मात्र गेल्या तीन आठवड्यापासून येथे कॊरोना रुग्णांचे मृत्यू होण्यास सुरुवात झाली असून हे मृत्यू काही कमी होताना दिसत नाहीत. आतापर्यंत (केवळ 3 आठवड्यात) येथे 91 मृत्यू झाल्याची माहिती कोविड सेंटरमधील एका डॉक्टरांनी दिली आहे.

याविषयी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांना विचारले असता त्यांनी तीन आठवड्यापूर्वी संपूर्ण सेंटरमध्ये एकही मृत्यू नव्हता. पण आता आयसीयू वॉर्डमध्ये मृत्यू होत असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याचवेळी पालिकेने आरोग्य क्षेत्रातील एका खासगी कंपनीला आयसीयू वॉर्ड चालवण्यासाठी दिल्याचे म्हणत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारणा केली असता त्यांनी बीकेसी कोविड सेंटरमध्ये मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे खासगी कंपनीकडून आणि संबंधित आमच्या अधिकाऱ्याकडून हे मृत्यू का होत आहेत, याची कारणे देत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

लवकरच कळणार का होतात मृत्यू ?

पालिकेकडून या खासगी कंपनीला एका आयसीयू बेडमागे 6 हजार रुपये दिले जात आहेत. तर त्याबरोबर औषधे आणि आवश्यक ती सर्व साधनसामग्रीही दिली जात आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तेव्हा हे मृत्यू नेमके का होत आहेत हे लवकरच अहवालावरून समजेल. तर मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आल्याची माहिती काकाणी यांनी दिली आहे.

नेस्कोमध्ये एकही मृत्यू नाही

बीकेसी कोविड सेंटरमध्ये मृत्यू वाढत असताना गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमध्ये मात्र एकही मृत्यू अद्याप झालेला नसून ही दिलासादायक बाब आहे. तर वरळी कोविड सेंटरमध्ये तीन-चारच मृत्यू झाले असून मुलुंड सेंटर अजून पूर्णक्षमतेने सुरू झाले नसल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे. नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ नीलम आंद्रडे यांनी दिली आहे. नेस्कोमध्ये आतापर्यंत 3 हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर अडीच हजाराहुन अधिक रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 345 रूग्ण अँक्टिव्ह आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.