ETV Bharat / city

Genome Sequencing Analysis : जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांच्या ८ व्या फेरीत ८९ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण - मुंबईत एकूण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ (Corona Cases Hike in Mumbai) झाली आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णही आढळून (Omicron Cases Hike) येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या (Genome Sequencing Test) केल्या जात आहेत. पालिकेने केलेल्या आठव्या फेरीतील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचे ८९ टक्के रुग्ण आढळून आले आहेत.

file photo
फाईल फोटो
author img

By

Published : Jan 24, 2022, 6:38 PM IST

Updated : Jan 24, 2022, 10:08 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ (Corona Cases Hike in Mumbai) झाली आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णही आढळून (Omicron Cases Hike) येत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या (Genome Sequencing Test) केल्या जात आहेत. या चाचण्यांच्या सातव्या फेरीत मुंबईत ‘ओमायक्रॉन’चे (Omicron) ५५ टक्के रुग्ण आढळून आले होते. पालिकेने केलेल्या आठव्या फेरीतील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉनचे ८९ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ टक्के डेल्टा डेरिव्हेटीव्हचे, ३ टक्के डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • २८० पैकी ८९ टक्के ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण -

मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. या लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. डिसेंबरपासून तिसऱ्या लाटेत कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णातही वाढ झाली आहे. मुंबईत कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत, त्या विषाणूचा किती प्रसार झाला आहे याची माहिती मिळवण्यासाठी पालिकेकडून वेळोवेळी नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचण्या केल्या जात आहेत. पालिकेकडून ८ व्या फेरीतील चाचण्यांसाठी ३७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २८० नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे बृहन्मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील २८० नमुन्यांपैकी ८९ टक्के म्हणजेच २४८ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटचे असल्याचे निदर्शनास आले. ८ टक्के म्हणजेच २१ नमुने हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ या व्हेरियंटचे, तर उर्वरित सुमारे ३ टक्के म्हणजेच ११ नमुने हे इतर व्हेरियंटचे असल्याचे आढळून आले आहे. या ११ नमुन्यांपैकी २ नमुने हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ या व्हेरियंटचे असल्याचे निदर्शनास आले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

  • ३४ टक्के रुग्ण हे २१ ते ४० वयोगटातील -

८ व्या फेरीतील चाचणींमधील २८० रुग्णांपैकी ३४ टक्के म्हणजे ९६ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. या खालोखाल २८ टक्के म्हणजेच ७९ रुग्ण हे ४१ ते ६० या वयोगटातील आहेत. २५ टक्के म्हणजेच ६९ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ८ टक्के म्हणजेच २२ रुग्ण हे '० ते २०' या वयोगटातील; तर ५ टक्के म्हणजे १४ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २८० नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील १३ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, २ नमुने ० ते ५ वर्षे या वयोगटातील, ४ नमुने ६ ते १२ वर्षे या वयोगटातील; तर ७ नमुने १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या व्हेरियंटचे असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत.

  • लस न घेतलेल्या १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज -

‘कोविड’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आधारे विश्लेषण केले असता, २८० पैकी ७ रुग्णांनी लशीची केवळ पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले; तर २ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले. लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १७४ रुग्णांपैकी ८९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी २ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली, तर १५ रुग्णांना अतिदक्षात विभागात दाखल करावे लागले. एकूण रुग्णांपैकी ९९ रुग्णांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती. यापैकी ७६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आणि ५ रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले.

  • कोरोना नियमांचे पालन करा -

विविध व्हेरियंटची होणारी लागण लक्षात घेता, ‘कोविड - १९’ विषाणू प्रतिबंधात्मक निर्देशांचे काटेकोर पालन प्रत्येकाने आपापल्या स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये प्रामुख्याने ‘मास्क’चा वापर, दोन किंवा अधिक व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखणे, नियमितपणे साबण लावून हात धुणे, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने करण्यात आले आहे. सर्व मुंबईकर नागरिकांनी या उपाययोजनांची कटाक्षाने व कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे विनम्र आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

  • सातव्या फेरीत ५५ टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण -

पालिकेकडून सातव्या फेरीत ३७६ रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील २८२ रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या २८२ नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात आले. त्यानुसार २८२ नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिअंटचे ३७ रुग्ण (१३ टक्के), डेल्टा डेरिव्हेटीव्ह - ८९ रुग्ण (३२ टक्के) तर ओमायक्रॉनचे १५६ रुग्ण (५५ टक्के) रुग्ण आढळून आले. २८२ पैकी फक्त १७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ओमायक्रॉन बाधित १५६ पैकी केवळ ९ जणांना रुग्णालयीन उपचारांची गरज भासली. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. यासोबत, त्यांना ऑक्सिजन पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही. असे असले तरी, नागरिकांनी गाफील न राहता दक्ष राहणे गरजेचे आहे असे पालिकेने म्हटले आहे. तर नमुने संकलित केलेल्यांपैकी डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला होता.

Last Updated : Jan 24, 2022, 10:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.