ETV Bharat / city

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच.. 8,839 नवे रुग्ण, 53 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज 8 हजार 839 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 61 हजार 998 वर पोहचला आहे. आज 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 242 वर पोहचला आहे. 9 हजार 33 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 63 हजार 344 वर पोहचली आहे

new corona patients found in mumbai
new corona patients found in mumbai
author img

By

Published : Apr 16, 2021, 9:58 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवस 8 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. गेले काही दिवस त्यात चढ उतार पाहायला मिळत आहे. आज 8,839 रुग्ण आढळून आले आहेत. 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 9 हजार 33 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने नव्या रुग्णापेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

9 हजार 33 रुग्णांना डिस्चार्ज -

मुंबईत आज 8 हजार 839 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 61 हजार 998 वर पोहचला आहे. आज 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 242 वर पोहचला आहे. 9 हजार 33 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 63 हजार 344 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 85 हजार 226 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 43 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 97 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 169 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 48 लाख 51 हजार 752 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -

गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.