ETV Bharat / city

Delta Plus Variant : राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या ७६, रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना - डेल्टा प्लस रूग्णसंख्या

राज्यातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या ७६ वर गेली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरी, जळगाव, मुंबई, कोल्हापूर, ठाणे आणि पुणे येथे आहेत.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Aug 16, 2021, 6:53 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात येत असताना डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोल्हापूरमध्ये ६, रत्नागिरीमध्ये ३ तर सिंधुदुर्गमध्ये १ अशा १० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या ७६ वर गेली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे रत्नागिरी, जळगाव, मुंबई, कोल्हापूर, ठाणे आणि पुणे येथे आहेत. डेल्टा प्लसला रोखण्यासाठी विभागीय पातळीवर रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापन करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

७६ रुग्णांपैकी ७१ रुग्ण आजारातून बरे -

आतापर्यंत राज्यात ७६ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३७ पुरुष असून ३९ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३९ डेल्टा प्लस रुग्ण १९ ते ४५ वर्ष वयोगटातील आहेत, तर त्या खालोखाल ४६ ते ६० वर्ष वयोगटातील १९ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ९ बालके असून ६० वर्षांवरील ९ रुग्ण आहेत. ६६ पैकी ३७ रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार सुरू आहेत. डेल्टा प्लसच्या ७६ रुग्णांपैकी ७१ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत.

लस घेतलेल्या २२ जणांना डेल्टाची लागण -

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या २२ जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे. २२ पैकी १० जणांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. तर, १२ जणांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. लसीकरण झालेल्यांपैकी २ व्यक्तींनी कोव्हॅक्सिन तर इतर २० जणांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले होते.

५ रुग्णांचा मृत्यू -

६६ पैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३ पुरुष २ स्त्रिया आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात २, बीड, मुंबई, रायगड येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले पाचही रुग्ण ६५ वर्षांवरील असून त्यांना अति जोखमीचे आजार होते. मृत्यू झालेल्या २ जणांनी कोव्हिशिल्डचे डोस घेतले होते. २ जणांनी कोणतीही लस घेतली नव्हती. तर, एकाच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सेंटीनल सर्वेक्षण, जिनोमिक सिक्वेन्सिंग -

राज्यातील ५ प्रयोगशाळा आणि ५ रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवड्याला १५ प्रयोगशालेय नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते. जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजेच, जिनोमिक सिक्वेन्सिंगला गती मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या प्रयोगशाळेसोबत करार केला असून, या नेटवर्कद्वारे दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्यातून १०० प्रयोगशाळा नमुन्यांची तपासणी करण्यात येते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

'त्रिसूत्रीचे पालन करावे, जागृत रहा'

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे ७६ रुग्ण आढळून आले आहेत. या व्हेरियंटचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या रुग्णांना या व्हेरियंटची लागण झाली आहे, त्यांच्या गेल्या काही दिवसातील माहिती गोळा केली जात आहे. ज्यामध्ये त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती का? त्यांना लागण कुठे झाली? याची माहिती घेतली जात आहे. या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हायरिक्स लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण होऊ नये म्हणून कोविड त्रिसूत्रीचे पालन करावे, जागृत रहावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेे आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण -

रत्नागिरी - १५
जळगाव - १३
मुंबई - ११
कोल्हापूर - ७
ठाणे - ६
पुणे - ६
रायगड - ३
पालघर - ३
नांदेड - २
गोंदिया - २
सिंधुदुर्ग - २
चंद्रपूर - १
अकोला - १
सांगली - १
नंदुरबार - १
औरंगाबाद - १
बीड - १

एकूण रुग्ण - ७६

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.