ETV Bharat / city

एसटीच्या ७२ वा वर्धापन दिन.. तर कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देणार - अनिल परब - एसटी कर्मचारी

एसटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त, कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये, आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना राज्यशासनाच्या धर्तीवर ५० लाख रुपये आर्थिक मदत एसटी महामंडळातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.

72nd anniversary of ST
एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब
author img

By

Published : Jun 1, 2020, 10:07 PM IST

मुंबई - एसटीच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त, कोविड-१९ च्या परिस्थितीमध्ये, आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना (कोविड-१९ मुळे मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबियांना) राज्यशासनाच्या धर्तीवर ५० लाख रुपये आर्थिक मदत एसटी महामंडळातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केली आहे.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब

व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे राज्यातील विविध एसटी कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी तसेच विभाग नियंत्रकांशी ते बोलत होते. भर उन्हामध्ये रस्त्याने पायपीट करत, चालत जाणाऱ्या परप्रांतीय श्रमिकांना आपल्या एसटीने मोलाचा आधार दिला आहे. राज्यशासनाच्या निर्देश नुसार ९ मे पासून ३१ मे पर्यंत एसटीच्या तब्बल ४४ हजार १०६ बसेस द्वारे सुमारे ५ लाख ३७ हजार ५९३ श्रमिकांना मोफत त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत अथवा नजीकच्या रेल्वे स्थानक पर्यंत सुखरूप नेऊन सोडण्याचे काम एसटीच्या बहाद्दर कर्मचाऱ्यांनी करून दाखवले आहे. या कामाचे कौतुक खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे कोविड योद्धे (डॉक्टर, परिचारिका, पोलीस, सफाई कर्मचारी), विद्यार्थी, ऊसतोडणी कामगार मजूर अशा विविध घटकांचे 'सारथ्य' करण्याचे शिवधनुष्य एसटीने लीलया पेलले आहे. अर्थात, १ जूनला आपला ७२ वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या 'एसटी' साठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी कार्यरत असलेले एसटीचे सर्व कर्मचारी, पर्यवेक्षक, व अधिकारी कौतुकास पात्र आहेत. परंतु, कोविड च्या संकट नंतर एसटीच्या आर्थिक स्थितीला सावरून पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांचे सकारात्मक योगदान आवश्यक असणार आहे. त्यासाठी नाविन्यपूर्ण सूचना व मार्गदर्शनाचे एसटीच्या वरिष्ठ प्रशासनाकडून स्वागतच केले जाईल याची त्यांनी ग्वाही दिली. गेल्या ७२ वर्षांमध्ये महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून काम करणाऱ्या एसटीने सर्वसामान्य प्रवाशी जनतेची विश्वाहर्ता जपली आहे, एवढंच नव्हे,तर या संकट प्रसंगी सगळे जग स्तब्ध झाले असताना, एसटीने मात्र वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदतीचा हात देऊन आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

येणार काळ अत्यंत खडतर असून,अगोदरच सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा संचित तोटा सहन करणाऱ्या एसटीला भविष्यात माल वाहतुकीसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे लागणार आहेत. तसेच उपलब्ध साधन सामग्रीचा अत्यंत नियोजनपूर्वक व काटकसरीने उपयोग करून, किमान तोटा होणार नाही इतपत कार्यक्षमता वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. यावेळी एसटीच्या प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देताना, एसटीच्या गतवैभवाला गवसणी घालण्यासाठी सर्वांनीच अपार कष्ट घेऊन येणाऱ्या ७३ व्या वर्धापन दिनी एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची शपथ घेऊया असे प्रतिपादन अनिल परब यांनी केले आहे. या प्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकशेखर चन्ने यांच्यासह एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.