ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : नॉट रिचेबल झालेल्या आमदारांचे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीत फोटो सेशन - एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे वाद

मंत्री दादा भुसे, उदय सामंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच गुवाहाटीला दाखल होणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Shiv Sena MLAs Not Reachable
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 23, 2022, 8:35 AM IST

Updated : Jun 23, 2022, 11:20 AM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या तीन दिवस सुरू असलेल्या राजकीय बंडात अनेक आमदार सहभागी होत आहेत. गुवाहाटीत पोहोचलेल्या आमदारांनी फोटोसेशन केले. हा फोटो व्हायल होत आहे. शिवसेनेला हा हादरा असताना सात आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली होती. मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड या आमदारांचा समावेश आहे. हे सर्व आमदार गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले.

  • Sada Sarvankar and Mangesh Kudalkar - two Shiv Sena MLAs, who were reported to have left Mumbai last night also seen with Eknath Shinde in Guwahati, Assam. pic.twitter.com/rRSVg2poUR

    — ANI (@ANI) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकनाथ शिंदेंचे बंड - एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निकालानंतर बंड पुकारले आहे. ४० पेक्षा अधिक आमदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. सुरतमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबवण्यात आले होते. त्यानंतर एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेण्यात आले आहे. या सर्व आमदारांना ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये ठेवले आहे. सेनेचे ४० पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला असताना गुलाबराव पाटील, रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित या गुवाहाटीत पोहचल्या आहेत. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आणखी आमदार नॉटरिचेबल - दुसरीकडे मंत्री दादा भुसे, उदय सामंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले आहेत. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच गुवाहाटीला दाखल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. सर्वच आमदार शिंदे यांच्या गोटात गेल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Last Updated : Jun 23, 2022, 11:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.