मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोना संक्रमन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा प्रादुर्भाव कोरोना योद्धे असलेल्या मुंबई पोलिसांवर होऊ लागला आहे. कोरोना विषाणूची बाधा होऊन आज आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागात काम करणाऱ्या शिवाजी सोनावने (56) या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना संक्रमनाशी झुंझत असताना आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनवणे यांच्यासह आतापर्यंत तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पोलीस हवालदार शिवाजी सोनवणे हे कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा अखेर आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. त्याच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी ट्विट करून मुंबई पोलिसांना श्रद्धांजली वाहत दु:ख व्यक्त केले आहे.
गेल्या काही दिवसात मुंबई पोलीस खात्यातील चंद्रकांत गणपत पेंदूरकर (57) , संदिप महादेव सुर्वे (52) या पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सोनावणे यांचा बळी गेला आहे.
कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्या मृत पोलिसाच्या कुटुंबास शासनाकडून ५० लाखाची मदत देण्यात येणार आहे