मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. आज (शनिवारी) मुंबईत 536 नवे रुग्ण आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 90 हजारावर तर बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा 2 लाख 70 हजारांवर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मृतांचा आकडा 11 हजारावर -
मुंबईत आज कोरोनाचे 536 नवे रुग्ण आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 10 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 90 हजार 336 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 11 हजार 068 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 463 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 70 हजार 135 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 279 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 363 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 363, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 292 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 2 हजार 560 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 22 लाख 92 हजार 359 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या-
- १६ नोव्हेंबर - ४०९
- १७ नोव्हेंबर - ५४१
- १८ नोव्हेंबर - ८७१
- १९ नोव्हेंबर - ९२४
- २० नोव्हेंबर - १०३१
- २१ नोव्हेंबर - १०९२
- २२ नोव्हेंबर - ११३५
- २३ नोव्हेंबर - ८००
कमी नोंद झालेली रुग्णसंख्या - - 7 नोव्हेंबर 576 रुग्ण.
- 2 नोव्हेंबर 706 रुग्ण
- 3 नोव्हेंबर 746 रुग्ण
- 6 नोव्हेंबर 792 रुग्ण
- 9 नोव्हेंबर 599 रुग्ण
- 10 नोव्हेंबर 535 रुग्ण
- 14 नोव्हेंबर 574 रुग्ण
- 16 नोव्हेंबर 409 रुग्ण
हेही वाचा- भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी