ETV Bharat / city

Ganesh Chaturthi 2022: मुंबईतील वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा पशुपतिनाथ मंदिराची 52 फुटांची प्रतिकृती

मुंबईतील वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ( Bandra West Public Ganeshotsav Mandal Mumbai ) गणेश पूजा मंडप, काठमांडूच्या प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती ( Replica of Pashupatinath Temple ) साकारली आहे. ( Ganeshotsav 2022 )

Bandra West Public Ganeshotsav Mandal
वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळ
author img

By

Published : Sep 2, 2022, 3:42 PM IST

मुंबई : दरवर्षी प्रसिद्ध मंदिराची हुबेहूब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ( Bandra West Public Ganeshotsav Mandal Mumbai ) या वर्षी काठमांडू येथील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची ( Replica of Pashupatinath Temple ) ५२ फूट उंच प्रतिकृती साकारली आहे. पशुपतिनाथ हे भगवान महादेवाचे नेपाळमधील प्राचीन मंदिर आहे.

यंदा मंडळाचे हे २७ वे वर्ष - जागतिक वारसा लाभलेल्या वास्तूंपैकी एक असलेल्या या मंदिराची वास्तुरचना पॅगोडा पद्धतीची आहे. मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग आणि गाभाराही हुबेहूब साकारला आहे. या मंडळाचे हे २७ वे वर्ष असून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार त्याचे प्रमुख सल्लागार आहेत.

दरवर्षी एका प्रसिद्ध देवस्थानाचे दर्शन : मंडळातर्फे दरवर्षी एका प्रसिद्ध देवस्थानाचे दर्शन घडवले जाते. गेल्या वर्षी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली होती. त्यापूर्वी शिर्डीचे साई मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर यांसह महाराष्ट्र,( Vitthal Temple of Pandharpur ) गुजरात, गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांची आरास केली होती. कोरोनाकाळातही उत्सवाची परंपरा खंडित झाली नव्हती. धार्मिक, वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येत आहेत, असे मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा: Ganesha Chaturthi 2022: भोपाळच्या प्रसिद्ध महागणेशा मंदिरातील गणपतीची दुर्मिळ मूर्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.