मुंबई - दहीहंडीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना एकीकडे गोविंदा थरावर थर रचत या हंड्या फोडताना dahi handi दिसत आहेत. तर, दुसरीकडे राजकीय टोलेबाजी होताना दिसत आहे. आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसेच, यापुढे असेच थर वाढत जाती, असा विश्वास देखील मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला cm eknath shinde taunt uddhav thackeray आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथील मानाच्या हंडीला हजेली लावली. यावेळी स्टेजवर येताच, या वेळेचा गोविंदा जोरात ना?, अशी साद घालत जबरदस्त टोलेबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य सरकारने गोविंद दादा विम्याचे कवच तर दिलेच परंतु त्यासोबतच या दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला. यासोबतच पुढच्या वर्षी प्रो-कबड्डी प्रमाणे प्रो-गोविंदा होईल आणि नोकरीत गोविंदांना पाच टक्के आरक्षण मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरची हजेरी - टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मनाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याने मला अभिमान आहे, असे श्रद्धा कपूरने म्हटलं आहे.
हेही वाचा - Abdul Sattar कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस शेती करणार आणि शिकणार