ETV Bharat / city

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गरीबांच्या आरोग्यासाठी ५ लाखांचा निधी

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “द व्हायरल फिवर” कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५ लाखांचा, तर आमदार मंगेश कुडाळकर यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे.

निधी सुपुर्द
निधी सुपुर्द
author img

By

Published : Jun 15, 2021, 7:11 AM IST

मुंबई - राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त "द व्हायरल फिवर” कंपनीकडून गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५ लाख रुपये, तर आमदार मंगेश कुडाळकर यांच्याकडून महापौर निधीला २५ हजार अशी एकूण ५ लाख २५ हजाराची रक्कम आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

गरीब रुग्णांसाठी ५ लाख

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “द व्हायरल फिवर” कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी ५ लाखांचा निधी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे ट्रॅामा केअर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने हा निधी देण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रमोद नगरकर यांच्याकडे पाच लाखांचा धनादेश भायखळा येथील महापौर निवासस्थानी सुपुर्द करण्यात आला आहे. “द व्हायरल फिवर” कंपनीचे संस्थापक अर्णबकुमार यांनी गोरगरीब रुग्णांच्या आरोग्य कल्याणासाठी आर्थिक मदतीचे उचललेले पाऊल हे सर्वांना प्रेरणादायी असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले. याप्रसंगी व्हायरल फिवरच्या मानव संसाधन अधिकारी भुवनेश्वरी उपस्थित होत्या.

आमदारांकडून २५ हजाराची मदत

तसेच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार मंगेश कुडाळकर यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी रजनी कुडाळकर, चित्रपट सेनेचे अभिनेते दिगंबर नाईक उपस्थित होते.

हेही वाचा - डोंबिवलीत एक रुपये प्रति लिटर पेट्रोल, नागरिकांच्या लांब रांगा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.