मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाला हाताळण्यासाठी एमबीबीएस उत्तीर्ण झालेले 4 हजार 923 डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. आता हे डॉक्टर 40 शासकीय रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये एक वर्षांची सक्तीची इंटरर्नशिप करणार आहेत.
राज्य शासनाचे आदेश-
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती तयार झाली आहे. त्यात वाढत्या रुग्णांना बेड्सची संख्या वाढवताना त्याच प्रमाणात प्रशिक्षित डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत होती. राज्य सरकारने नुकतेच आरोग्य विज्ञान विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थांना शासकीय रुग्णालय आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये एक वर्षांची सक्तीची इंटरर्नशिप करण्याचे आदेश दिलेत आहे. यामुळे सोमवारी जाहीर केलेल्या एमबीबीएसच्या निकालानंतर राज्यातील बिकट करोनास्थिती हाताळण्यासाठी 4 हजार ९२३ नवे डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाठवली-
राज्यातील करोनाची स्थिती बिकट होत असताना आारोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मात्र, हा ताण आता कमी होणार असून आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमबीबीएसची अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करत चार हजार ९२३ उत्तीर्ण विद्यार्थ्यांची यादी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे पाठविली आहे. हे विद्यार्थी आता एक वर्षाच्या इंटर्नशिपसाठी अर्ज करणार आहेत.
अवघ्या २५ दिवसांत निकाल जाहीर-
राज्यातील बिकट आरोग्य व्यवस्था आघाडीवर करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची आवश्यकता होती. यामुळे सरकारी रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयांकडून निकाल वेळेत जाहीर करण्याबाबत मागणी होत होती. यानुसार विद्यापीठाने अवघ्या २५ दिवसांत निकाल जाहीर केला. आरोग्य विज्ञान विद्यानपीठाने ८ ते २४ मार्च या कालावधीत परीक्षा घेतली होती. ३० मार्चला प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेला पाच हजार १५२ विद्यार्थी बसले होते. यापैकी चार हजार ९२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.