ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 1350 नवे रुग्ण, 57 रुग्णांचा मृत्यू - शहरात कोरोनाचे 1350 नवे रुग्ण

मुंबई शहरात कोरोनाचे 1350 नवे रुग्णआढळले आहेत. शहरात बुधवारी 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

350 new corona patients have been found in Mumbai
मुंबईत कोरोनाचे 1350 नवे रुग्ण, 57 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : May 19, 2021, 8:26 PM IST

मुंबई - शहरात गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. मंगळवारी 953 नवे रुग्ण आढळून आले होते. आज (बुधवारी) त्यात वाढ होऊन 1350 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4565 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 269 दिवस -

मुंबईत आज 1 हजार 350 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 92 हजार 239 वर पोहचला आहे. आज 57 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 409 वर पोहचला आहे. 4 हजार 565 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 46 हजार 163 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 29 हजार 643 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 269 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 78 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. 284 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 22 हजार 788 तर आतापर्यंत एकूण 59 लाख 56 हजार 953 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -

1 मे रोजी 3908, 2 मे रोजी 3672, 3 मे रोजी 2662, 4 मे रोजी 2554, 5 मे रोजी 3879, 6 मे रोजी 3056, 7 मे रोजी 3039, 8 मे रोजी 2678, 9 मे रोजी 2403, 10 मे रोजी 1794, 11 मे रोजी 1717, 12 मे रोजी 2116, 13 मे रोजी 1946, 14 मे रोजी 1657, 15 मे रोजी 1447, 16 मे रोजी 1544, 17 मे रोजी 1240, 18 मे रोजी 953, 19 मे रोजी 1350 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.