ETV Bharat / city

राज्यात एकाच दिवशी ३५० कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; मुंबई, पुण्यात सर्वाधिक बरे झालेले रुग्ण

राज्यात सोमवारी एकाच दिवशी ३५० कोरोनाबाधितांना घरी सोडण्यात आले. त्यात मुंबई आणि पुणे मंडळात बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना यश येत असून त्यामुळे नातेवाईकांना दिलासा मिळत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

author img

By

Published : May 5, 2020, 8:34 PM IST

Health Minister Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असताना नागरिकांना दिलासा देणारी एक बाब समोर आली आहे. सोमवारी दिवसभरात राज्यातील तब्बल ३५० रुग्णांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळातून २२८ रुग्ण काल घरी गेले. त्यापाठोपाठ पुणे मंडळातील ११० रुग्णांना घरी पाठवण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कालपर्यंत राज्यात एकूण २,४६५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांवर प्रभावी उपचार होत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्यानेही चाचण्या मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्णांचे निदान वेळेत होत आहे.

हेही वाचा... मुंबई : कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयात पालिका करणार मोफत उपचार

राज्यात ९ मार्चला पहिले रुग्ण आढळून आल्यानंतर २३ मार्चला पहिल्यांदा पुणे येथील रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर दररोज राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. काल सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडले. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील १६५, ठाणे ३, ठाणे मनपा ११, नवी मुंबई मनपा १४, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा २३, रायगड ३ तर पनवेल मनपा येथील २ असे मुंबई मंडळात एकूण २२८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे मनपा ७२, पिंपरी-चिंचवड मनपा १४, सोलापूर मनपा २२ तर सातारा येथील २ असे पुणे मंडळात एकूण ११० रुग्णांना घरी सोडले. अमरावती मनपा १, बुलढाणा येथे १ तर नागपूर मनपा क्षेत्रात १० रुग्णांना घरी सोडण्यात आले.

सध्या राज्यात एकूण प्रयोगशाळा असून त्यापैकी २५ शासकीय आणि २० खासगी प्रयोगशळा आहेत. दररोज त्यांच्या माध्यमातून सात हजारपेक्षा जास्त चाचण्यांची क्षमता आहे. कालपर्यंत राज्यात पावणे दोन लाख नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार नमुने निगेटिव्ह आले आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.