ETV Bharat / city

मुंबईकरांसाठी खुशखबर; शुक्रवारपासून ३४ एसी लोकल वाढणार, पंतप्रधानांच्या हस्ते नव्या मार्गिकेचे होणार उद्घाटन! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे मार्गावर ३४ वातानुकूलित आणि दोन साधारण उपनगरीय सेवा वाढवण्यात येणार आहे. तसेच ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी होणार आहे.

34 AC locomotives to be added to Central Railway from Friday
मध्य रेल्वे मार्गाच्या मुख्य मार्गावर ३४ वातानुकूलित लोकल सेवा
author img

By

Published : Feb 15, 2022, 9:53 PM IST

मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेला ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे ( Thane-Diva 5th and 6th railway line ) काम पुर्ण झाले आहे. बहुप्रतीक्षित या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्घाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वे मार्गाच्या मुख्य मार्गावर ३४ वातानुकूलित लोकल सेवा ( 34 AC locomotives ) आणि दोन विना वातानुकुलीत (सामान्य) ( non-air-conditioned suburban services ) उपनगरीय सेवा वाढविण्यात येणार आहे.

३६ लोकल ट्रेन वाढणार -
मुंबईकरांचा लोकलचा प्रवास गर्दी मुक्त आणि अधिक वेगवान व आरामदायी होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-2 (एमयुटीपी) मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होते. मात्र, आता या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून १८ फेब्रुवारी २०२२ रोजी ठाणे-दिवा पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाची रेल्वेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. या नव्या मार्गिकेमुळे मध्य रेल्वेच्या ( Central Railway ) मुख्य मार्गावर एकूण ३६ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. या ३६ लोकलपैकी ३४ वातानुकूलित लोकल सेवा आणि दोन विना वातानुकुलीत (सामान्य) लोकल असणार आहे. विशेष म्हणजे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल ट्रेनची संख्य कमी करून त्या मुख्यमार्गावर चालविण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहेत.

34 AC locomotives to be added to Central Railway from Friday
ठाणे - दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उदघाटन येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार
आता एसी लोकलची संख्या ४४ -
सर्वप्रथम मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यात आली. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान दहा वातानुकूलित लोकल ट्रेन धावत आहे. येत्या शुक्रवारपासून ठाणे- दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिका सुरु झाल्याने मध्य रेल्वेवर आणखी ३४ वातानुकूलित लोकल ट्रेनची भर होणार आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शुक्रवारपासून ४४ एसी लोकल धावणार आहे.

लांब पल्याच्या गाड्यांची वाहतुक -

सध्या कुर्ला ते ठाणे आणि दिवा ते कल्याण दरम्यान पाचवा-सहावा मार्ग कार्यरत आहे. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या - सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पुर्ण झाल्याने उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्याच्या गाड्यांची वाहतुक वेगवेगळ्या रेल्वे ट्रॅकवरुन करणे सोयीचे झाले आहे. ठाणे ते दिवा दरम्यान टाकण्यात आलेल्या पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग हा ठाणे ते दिवा दरम्यानच्या धिम्या मार्गाला जोडला गेला आहे. या नव्या मार्गिकेमुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. या प्रकल्पातील मुंब्राजवळ दीड किलोमीटरचा उन्नत मार्ग, रुळांसह अन्य काही तांत्रिक कामे अद्यापही बाकी आहे. येत्या काळात ते पूर्ण करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.