मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ७५ कोटी सूर्य नमस्कार संकल्पामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ( Mumbai University ) क्रीडा व शारिरीक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि शारिरीक शिक्षण विभागाच्या वतीने ३१ लाख ३ हजार ७१७ सूर्य नमस्कारांचे योगदान देण्यात आले.
मुंबई विद्यापीठाचे पाऊल
आरोग्यासाठी सूर्यनमस्काराचे महत्त्व पुरातन काळापासून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक जागृतीसाठी मुंबई विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ७५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम १ ते ८ फेब्रुवारीदरम्यान विविध कॉलेजांमध्ये राबविला जाणार आहे. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सात जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने ८४ महाविद्यालये मिळून २३ लाख ३० हजार ३२८ सूर्य नमस्कार, राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ११८ महाविद्यालयाच्या वतीने ७ लाख ३३ हजार ५३१ सूर्य नमस्कार आणि शारीरक शिक्षण विभागाअंतर्गत १४६ सहभागींनी ३९ हजार ८५८ सूर्य नमस्काराचे यामध्ये योगदान दिले आहे. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने १४ जानेवारी पासून या उपक्रमाला सुरुवात केली, तर क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाने २३ जानेवारी २०२२ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरुवात केली.
अनेक विभागांचा सहभाग
शारिरीक शिक्षण विभागाच्या वतीने २८ जानेवारीला या उपक्रमाला सुरुवात झाली. १ ते ८ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा व शारिरीक शिक्षण विभाग आणि क्रीडा भारती कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी आणि प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सतीश पाठक उपस्थित होते. तर १८ फेब्रुवारी रोजी शारीरीक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या समारोप सोहळ्यात प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन सूर्य नमस्कारासाठी योगदान दिले. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहे.
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या वतीने ३१ लाख ३ हजार ७१७ सूर्य नमस्कारांचे योगदान - Azadi Ka Amrit Mahotsav
मुंबई विद्यापीठातर्फे ( Mumbai University ) ५ कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम १ ते ८ फेब्रुवारीदरम्यान विविध कॉलेजांमध्ये राबविला जाणार आहे. यात अनेक विभागांच्या वतीने ३१ लाख ३ हजार ७१७ सूर्य नमस्कारांचे योगदान देण्यात आले.