मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. काही भागात तापमान चाळीस अंशांच्यावर गेले आहे. उष्माघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण यामुळे वाढले असून राज्यात उष्माघाताच्या २९ संशयितांचा बळी गेले ( 29 heatstroke suspects killed in state ) आहेत. तर मागील अकरा दिवसात सहा जण दगावल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
तापमान ४० - ४५ अंशापर्यंत - राज्यात काही भागात अवकाळी पाऊस होत असला तरी उष्णतेचे प्रमाण मात्र वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात उष्णतेची दाहकता जाणवते. उष्णता वाढल्याने उष्माघाताने होणारे मृत्यूही वाढले आहेत. १० मे पर्यंत राज्यात एकाही उष्माघाताच्या बळीची नोंद नव्हती. मात्र ११ मे ते २१ मे दरम्यान सुमारे सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. वाऱ्याचा वेग वाढल्याने, मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य तज्ञांचे मत आहे. सध्या वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. उर्वरित भागात तापमान ४० ते ४५ अंशपर्यंत असल्याचे दिसून येत आहे.
२९ संशयितांचा मृत्यू - राज्यात उष्णता वाढल्याने १० मेपर्यंत ५४३ मग आताचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये विविध जिल्ह्यातील २९ संशयितांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. पैकी ५ जळगाव, १२ नागपूर, ३ जालना, ३ अकोला, २ अमरावती, १ औरंगाबाद, १ हिंगोली, १ उस्मानाबाद, १ परभणी जिल्ह्यात मृत्यू झाले आहेत. सहा जणांच्या मृत्यूचा अहवाल आला असून ते उष्माघाताचे बळी ठरले आहेत. उर्वरित मृत्यू उष्माघात संशयित आहेत. त्यांच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल, असे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी - भरपूर पाणी प्या, सनकोट घाला, डोळे-कान, डोक्याला रुमाल बांधा, अत्यावश्यक काम असेल तरच दुपारी बारा ते पाच दरम्यान घराबाहेर पडा. शक्यतो वाढत्या उष्णतेमुळे घराबाहेर पडणे टाळा. आरोग्याची काळजी घ्या असे, आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी कुतुबमिनारच्या उत्खननाचा दावा फेटाळला