ETV Bharat / city

नायरमध्ये सुरू होणार 24 तास हेल्पलाईन; निवासी डॉक्टरांचा तणाव कमी करण्यासाठी मार्डचा पुढाकार - नायरमध्ये सुरू होणार 24 तास हेल्पलाईन

मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयात नुकतीच एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केली आहे. तर या आधीही काही निवासी डॉक्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

mumbai
mumbai
author img

By

Published : Feb 19, 2021, 9:21 PM IST

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयात नुकतीच एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केली आहे. तर या आधीही काही निवासी डॉक्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कामाच्या, अभ्यासाच्या आणि इतर कारणाने निवासी डॉक्टर तणावाखाली येत आहेत. तेव्हा त्यांचा हा तणाव दूर करण्यासाठी नायर मार्ड पुढे सरसावले आहे. लवकरच नायरमध्ये एक 24 तास हेल्पलाईन सुरू केली जाणार आहे. या हेल्पलाईनवर निवासी डॉक्टरांचे कौन्सिलिंग केले जाणार असल्याची माहिती नायर मार्डकडून देण्यात आली आहे. तर स्ट्रेसमॅनेजमेंटसाठी अन्यही उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दोन वर्षात दोन डॉक्टरांच्या आत्महत्या

2019 मध्ये डॉ पायल तडवी यांनी नायर रुग्णालयात आत्महत्या केली. हे प्रकरण खूपच गाजले. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉ पायलने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तर यानंतर आता 16 फेब्रुवारीला डॉ भीमसंदेश तुपे या निवासी डॉक्टरने नायरमध्ये आत्महत्या केली आहे. या डॉक्टरने आत्महत्या नेमकी का केली हे स्पष्ट नाही. पण ताणतणावाखाली निवासी डॉक्टरही अशी टोकाची भूमिका घेत असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. दरम्यान या एक-दीड महिन्यात आणखी दोन-तीन निवासी डॉक्टरांनी ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. पण याची अधिकृत माहिती नाही.

निवासी डॉक्टरांचे केले जाणार नियमित समुपदेशन

डॉ तुपे याने कौटुंबिक ताणताणावातून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. त्याचवेळी कामाचा मोठा ताण नेहमीच निवासी डॉक्टरांवर असतो. त्यामुळे नायर मार्डने आता एक 24 तास हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या हेल्पलाईन नंबरवर फोन करत डॉक्टरांना आपल्या समस्या मांडता येतील. तर समोरील मानसशास्त्रज्ञ त्यांचे योग्य ते समुपदेशन करतील असेही नायर मार्डकडून सांगण्यात येत आहे. त्याचवेळी निवासी डॉक्टरांच्या स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी यापुढे नियमित वर्कशॉपही घेतले जाणार आहेत. तर इतरही उपाययोजनाचा विचार सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.