मुंबई: जानेवारी ते जुलै 2021 या सात महिन्याच्या कालावधीत देशात एकूण 86 वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने संकेतस्थळावर दर्शवली आहे. याच कालावधीत राज्यात विविध कारणांमुळे तेवीस वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
विष प्रयोगामुळे 4 तर शिकारीमुळे 2 दगावले
राज्यात मृत्यू पावलेल्या तेवीस वाघा पैकी नैसर्गिक कारणांमुळे 15 वाघांचा मृत्यू झाला. रेल्वे अपघातात एका वाघाचा मृत्यु झाला तर विष प्रयोगामुळे चार आणि शिकारीमुळे दोन वाघांना जीव गमवावा लागला. विद्युत प्रवाहामुळे एका वाघाचा जीव गेला. यात 8 बछड्यांचा तर 15 वयस्क वाघांचा समावेश होता.
मुकुटबन क्षेत्रातील दोन आरोपींना अटक
उमरेड पवनी करहांडला येथे अभयारण्यात एक वाघ आणि तीन बछड्यांना विषप्रयोग करून मारल्याची कबुली एका कालवडी च्या मालकाने दिली आहे यासंदर्भात प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. दोन वाघांची शिकार करणाऱ्या पांढरकवडा वन विभागातील मुकुटबन वनक्षेत्रातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी आणखी पाच जणांना संशयित म्हणून अटक करण्यात आली होती मात्र त्यांना न्यायालयाने जामिनावर सोडून दिले आहे यासंदर्भात न्यायिक कारवाई सुरू आहे.
क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना
व्याघ्र आणि इतर वन्य प्राण्यांच्या शिकारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना (measures of the state government ) करण्यात येत आहेत. वन्यप्राण्यांचा मागोवा घेणे कॅमेरा ट्रॅप लावणे एसटीपीएफ पथकाद्वारे गस्त घालने. गुप्त सेवा निधी उपलब्ध करून देणे विद्युत ट्रीपिंग वर लक्ष ठेवणे. पाणस्थळाची तपासणी करणे. जंगलालगत विहिरीला कठडे बांधणे. जंगलात येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची नोंद घेण्याकरिता रजिस्टर ठेवणे या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहितीही भरणे यांनी दिली.