ETV Bharat / city

घातवार :मुंबई-पुण्यात भिंत, नाशकात टाकी कोसळली; ३१ जणांचा मृत्यू - pune wall collapses

मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून १९ जण, कल्याणमध्ये भिंत कोसळून ३ जण तर, पुण्यातील आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशकात टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. या सर्व घटनांमध्ये एकूण ३१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजचा वार राज्यात घातवार ठरला आहे.

घातवार : मुंबई-पुण्यात भिंत कोसळून २३ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:40 AM IST

Updated : Jul 2, 2019, 1:02 PM IST

मुंबई - राज्यात मंगळवार नागरिकांसाठी घातवार ठरला. मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून १९ जण ठार झाले. तर, कल्याणमध्ये भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच नाशकात निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला तर, २ जखमी झाले आहेत.

मालाड येथील कुरार भागात ही घटना घडली आहे. रात्री २ वाजल्यापासून या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. येथे अग्निशमन दल आणि NDRF च्या टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मालाडजवळच्या कुरार भागात ही धक्कादायक घटना घडली. तर, कल्याणमध्येही भिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला.

शनिवारीच पुण्यातल्या कोंढवा भागात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आंबेगांव सिंहगड येथील कँम्पसमध्ये सिमाभिंत कोसळली आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यृ झाला आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर हे मजूर काम करत होते. जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना ही सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते.

दुर्घटनेचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात केली. आतापर्यंत अग्निशामक दलाने ६ पुरुष व ३ महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यापैकी ६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. या घटनेत ठार झालेले ४ मजूर छत्तीसगढचे रहिवासी आहेत.

नाशिकमध्ये निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला तर, २ जखमी झाले आहेत.

दरम्यान, मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.