मुंबई - मुंबईतील 13 जूलै 2011 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातीला क्रमांक 5 चा आरोपी असलेल्या कफील अहमद खान याच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मुंबई येथील ओपेरा हाऊस, झवेरी बाजार, दादर पश्चिम येथे बॉम्बस्फोट घडवला होता. यात 26 जणांचा मृत्यू, तर 130 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाची इंडियन मुजाहिद्दीनने जबाबदारी घेतली होती.
त्या दिवसाचा घटनाक्रम -
पहिला बॉम्बस्फोट - 13 जुलै 2011, सायंकाळी- 6.54, ठिकाण- झवेरी बाजार, घटना- स्कूटरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 11 जणांचा मृत्यू, 4 जखमी
दुसरा बॉम्बस्फोट - सायंकाळी- 6.55, ठिकाण- ऑपेरा हाऊस, घटना- मोटर सायकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू, 6 जखमी
तिसरा बॉम्बस्फोट - सायंकाळी 7.06, ठिकाण- कबूतर खान, दादर, घटना- बेस्ट बस स्थानकाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 1 व्यक्तीचा मृत्यू