मुंबई - राज्यात गेल्या २४ तासांत २०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून दिवसभरात ८ हजार ९९२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर १० हजार ४५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के एवढे आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १ लाख १२ हजार २३१ इतकी आहे.
राज्यातील कोरोनाची आकडेवारी -
कोरोनामुळे गेल्या २४ तासांत २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने राज्यात १,२५,०३४ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही ९६.०८ टक्के आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर २.०३ टक्के एवढा आहे. दिवसभरात ८ हजार ९९२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १० हजार ४५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ५९,००,४४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के एवढे आहे. आजपर्यंत कोरोनाच्या ४,३५,६५,११९ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ६१,४०,९६८ (१४.१ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,२७,२४३ व्यक्ती गृहविलगीकरणात तर ४, ७५६ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख १२ हजार २३१ सक्रीय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्ण, मृत्यूंच्या संख्येत अपेक्षित घट नाही -
राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णांच्या आकडेवारीमध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यू याबाबतची आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून एका टप्प्यावर येऊन स्थिरावली आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात अपेक्षित घट होत नसल्याने आरोग्य विभागापुढील डोकेदुखी कायम असल्याचे दिसत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि करोनाची संभाव्य तिसरी लाट हेसुद्धा काळजी वाढवणारे विषय आहेत. यामुळे राज्यात कडक निर्बंध आजही लागू आहेत.
हेही वाचा - कोरोना नियंत्रणासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा - अजित पवार