ETV Bharat / city

'राज्यात लॉकडाऊनपासून आतापर्यंत 2 लाख 73 हजार गुन्हे; तर 25 कोटी 80 लाख रुपयांची दंड आकारणी'

राज्यात 22 मार्च ते 29 सप्टेंबरपर्यंत कलम 188 नुसार 273,059 गुन्हे नोंद झाले असून, 37,842 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर 96,485 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 28 कोटी 80 लाख 37 हजार 314 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

home minister
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Sep 30, 2020, 10:36 PM IST

मुंबई - लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 73 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 28 कोटी 80 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

हेही वाचा- सीमावाद चिघळलेला असताना लष्करी नेतृत्वात बदल, पुढील आठवड्यात चीनसोबत चर्चेची शक्यता

राज्यात 22 मार्च ते 29 सप्टेंबरपर्यंत कलम 188 नुसार 273,059 गुन्हे नोंद झाले असून, 37,842 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर 96,485 वाहने जप्त केली. यातील विविध गुन्ह्यांसाठी 28 कोटी 80 लाख 37 हजार 314 रुपये दंड आकारण्यात आला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु, काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 368 घटना घडल्या आहेत. त्यात 897 व्यक्तींना ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबर- 1 लाख 13 हजार फोन

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1,13,402 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,485 वाहने जप्त करण्यात आली.

कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 221 पोलीस व 25 अधिकारी अशा एकूण 246 पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

नागरिकांचा सहभाग

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.