मुंबई - गेल्या १९९३ ला अजमेरमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी जलीस अन्सारी उर्फ 'डॉ. बॉम्ब' याला कानपूरमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातून तो काल (गुरुवार) फरार झाला होता.
अन्सारी हा ६८ वर्षांचा असून अजमेरच्या तुरुंगात आपली शिक्षा भोगत होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला २१ दिवसांची पॅरोल मिळाली होती. त्यामुळे तो आपल्या घरी आला होता. यानंतर तो गुरुवारी मुंबईमधून फरार झाला होता. महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने हालचाल करत त्याला उत्तर प्रदेशातील कानपूरमधून अटक केली आहे.
उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. जलीस हा कानपूरमध्ये येत असताना त्याला अटक करण्यात आली. नेपाळला फरार होण्याचा आपला मानस होता, असे त्याने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : निर्भया प्रकरणातील दोषी विनय शर्माचा तिहार तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न