मुंबई - मुंबई पोलिसांमधील १८ उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये टीआरपी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्याचाही समावेश आहे. हे बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत.
टीआरपी घोटाळ्याचा तपास पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन) नंदकुमार ठाकूर यांची पोलीस उपआयुक्त (वाहतूक) या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. वैयक्तिक कारणामुळे ठाकूर यांच्या विनंतीमुळे हे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गुन्हे शाखेतील प्रकाश जाधव यांची निवड होणार आहे.
अशा आहेत मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या-
- शशीकुमार मीना यांची झोन १, दत्ता नलावडे यांची अमली पदार्थ प्रतिबंधक विभागात, विजय पाटील यांची झोन ४ मध्ये बदली करण्यात आली आहे.
- कृष्णकांत उपाध्याय यांची झोन ६ मध्ये तर एमसीव्ही महेश रेड्डी यांची झोन १० मध्ये बदली करण्यात आली आहे.
- बदल्यांच्या आदेशानुसार एस. चैतन्य यांच्याकडे डीसीपी ऑपरेशन्स, राहुल भुजबळ यांच्याकडे डीसीपी अंमलबजावणी असा पदभार स्वीकारणार आहेत.
- योगेशकुमार गुप्ता यांच्याकडे वाहतूक, संजय पाटील यांच्याकडे मुख्यालय-२ आणि एस. टी. राठोड यांच्याकडे एसबी-१ चा पदभार असणार आहे.