मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज शनिवारी 23 ऑक्टोबरला 1701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 33 मृत्यूंची नोंद झाली असून 1781 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के, तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा - तेलतुंबडे यांची केवळ आक्षेपार्ह आणि संशयास्पद पत्रे रोखली, NIA ची मुंबई उच्च न्यायालयात माहिती
24,022 सक्रिय रुग्ण
आज राज्यात 1701 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 01 हजार 551 वर पोहोचला आहे. तर, आज 33 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 998 वर पोहोचला आहे. आज 1781 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 33 हजार 919 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे.
रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 16 लाख 26 हजार 299 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.71 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 95 हजार 603 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 24 हजार 022 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715, 18 ऑक्टोबरला 1485, 19 ऑक्टोबरला 1638, 20 ऑक्टोबरला 1825, 21 ऑक्टोबरला 1573, 22 ऑक्टोबरला 1632, 23 ऑक्टोबरला 1701 रुग्ण आढळून आले आहेत. तर, 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29, 18 ऑक्टोबरला 27, 19 ऑक्टोबरला 49, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 454
अहमदनगर - 215
पुणे - 202
पुणे पालिका - 97
पिंपरी चिंचवड पालिका - 61
हेही वाचा - गोराई भागातील वेश्यव्यवसायावर छापा, तिघे अटकेत तर पाच जणींची सुटका