मुंबई - लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 9 लाख 646 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 807 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात 319 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 881 आरोपींना अटक झाली आहे.
लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस खात्यात आतापर्यंत 8 हजार 722 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये 900 पोलीस अधिकारी तर 7 हजार 822 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात 1955 पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त म्हणून उपचार घेत असून यात 207 अधिकारी तर 1748 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 6 हजार 670 पोलीस पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये 685 अधिकारी तर 5985 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात 97 पोलिसांचा मृत्यू झाला असून यामध्ये 8 अधिकारी तसेच 89 कर्मचारी आहेत.
राज्यात अनधिकृतपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आलेली असून आतापर्यंत 31 हजार 995 आरोपींना अनधिकृत वाहतूक प्रकरणी अटक झाली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 94 हजार 83 वाहने जप्त केली असून तब्बल 16 कोटी 99 लाख 93 हजारांचा दंड वसूल करण्यात आलाय. राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये 86 पोलीस जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 56 घटना घडलेल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये नियम मोडणाऱ्यांकडून १७ कोटींची वसूली; मात्र जवळपास ९ हजार पोलीस 'पॉझिटिव्ह' - mumbai police
लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आतापर्यंत कलम 188 नुसार महाराष्ट्र पोलिसांनी 2 लाख 9 लाख 646 गुन्हे दाखल केले असून राज्यभरात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 807 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात 319 प्रकरणात पोलिसांवर हल्ला झाला असून याप्रकरणी 881 आरोपींना अटक झाली आहे.