मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. 18 मे मंगळवारी तर 953 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र त्यात वाढ होऊन बुधवारी 1350 तर गुरुवारी 1425 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज पुन्हा 1416 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1766 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 317 दिवस -
मुंबईत आज 1 हजार 416 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 95 हजार 080 वर पोहचला आहे. आज 54 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 522 वर पोहोचला आहे. 1 हजार 766 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 49 हजार 389 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 29 हजार 103 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 317 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 69 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 273 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 33 हजार 078 तर आतापर्यंत एकूण 60 लाख 19 हजार 422 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416 नवे रुग्ण आढळून आले आहेत.