ETV Bharat / city

कोरोनामुळे महापालिकेच्या १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, सर्वाधिक १०७ मृत्यू चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे - मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोना

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांसह मुंबई महापालिकेच्या तब्बल २५८८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत चतुर्थ श्रेणीमधील १०७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Sep 4, 2020, 8:14 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कामगारांसह मुंबई महापालिकेच्या तब्बल २५८८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत चतुर्थ श्रेणीमधील १०७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मृत पालिका कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी पूर्ण केले नसल्याने कर्मचारी आणि कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. या रुग्णांवर उपचार करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मुंबईत स्वच्छता ठेवण्याचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करत आहेत. तर मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. लॉकडाऊन सुरू असताना रस्त्यावर राहणारे नागरिक, हातावर पोट असलेले कामगार, कोरोना झालेले रुग्ण, रुग्णाच्या संपर्कात असलेले संशयित रुग्ण आदींना रोज जेवणाची पाकीट पोहचवण्याचे काम पालिका कर्मचारी-अधिकारी करत आहेत. रुग्ण आढळून आला त्या ठिकाणी औषध फवारणीचे कामही पालिका कर्मचारी करत आहेत.

हेही वाचा - कंगनाच्या मुंबईबद्दलच्या कांगाव्याने नव्या वादाला जन्म! पाहा घटनाक्रम थोडक्यात...

या कामादरम्यान रुग्णांच्या संपर्कात आल्याने, रुग्ण असलेल्या ठिकाणी गेल्याने पालिकेच्या २५८८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात अ वर्गाचे ३, ब वर्गाचे 2, क वर्गाचे २० तर ड वर्गाच्या १०७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित आणि सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचाही कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला ५० लाख रुपये आणि अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार असल्याची घोषणा पालिका आयुक्तांकडून करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेल्या १२५ प्रकरणांपैकी ५ कर्मचाऱ्यांनाच ही मदत देण्यात आली. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि कामगार संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे.

मृतांमध्ये आरोग्य, सफाई कामगारांची संख्या अधिक -

मुंबई महापालिकेच्या २५८८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रसार होणाऱ्या काळात मुंबई स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मृत कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य आणि सफाई कामगारांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती 'म्युनिसिपल मजदूर युनियन'चे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.

५० लाखांची आर्थिक मदत नाहीच -

आतापर्यंत पालिकेने १२५ मृत कर्मचाऱ्यांचे दावे केंद्र सरकारकडे पाठवले होते. त्यापैकी फक्त ५ कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. इतरांचे दावे फेटाळण्यात आले आहेत. इतर मृत कर्मचाऱ्यांनाही केंद्रीय विमा योजनेत सामावून घ्यावे, अशी मागणी करणारे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पालिकेने लिहिले आहे. दरम्यान, कोरोनाशी लढा देताना कोणत्याही पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, तसेच एका वारसाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाईल, असे आश्वासन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत दिले होते. आता केंद्र सरकार देत नाही असे बोलून चालणार नाही. पालिका आयुक्तांनी दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अ‌ॅड. प्रकाश देवदास यांनी केले आहे.

हेही वाचा - तरुणांच्या जमावाकडून झालेल्या मारहाणीत दोघा भावांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.