ETV Bharat / city

Gram Panchayat Election : राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबर ऐवजी या तारखेला होणार मतदान

author img

By

Published : Sep 26, 2022, 7:21 PM IST

Updated : Sep 26, 2022, 8:43 PM IST

राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा (1165 gram panchayat voting and counting dates changed) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ( gram panchayat election new voting dates ) मतदान होईल.

gram panchayat election
ग्राम पंचायत निवडणूक

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी आहे. विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ला मतदान होणार ( 1165 gram panchayat voting ) नाही. हे मतदान आता ( 1165 gram panchayat counting ) 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

थेट सरपंचपदाचाही समावेश : राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी 1 हजार 166 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, असेही आयोगाने म्हटले आहे.

17 ऑक्टोबरला कळणार निकाल: राज्यातील 18 जिल्ह्यांमधील 1166 ग्रामपंचायत मध्ये येत्या 13 ऑक्टोबरला निवडणूक होणार असल्याची घोषनाझाली होती. ( State Election Commission ) तर 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होती. निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायती संदर्भात संबंधित तहसीलदार निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध करतील. त्यानंतर नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येईल. त्यानंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी मुदत देण्यात येईल. ते मागे घेतल्यानंतर उरलेल्या उमेदवारांना त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत ( gram panchayat election new voting dates ) मतदान होईल. तर 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

याठिकाणी होणार निवडणूक : जिल्हा ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. जिल्हा पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. जिल्हा रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. जिल्हा रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. जिल्हा सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. जिल्हा नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार जिल्हा: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे जिल्हा: मुळशी- 1 व मावळ- 1. जिल्हा सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.

कोल्हापूर जिल्हा: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम जिल्हा: वाशीम- 1. नागपूर जिल्हा: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा जिल्हा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर जिल्हा: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा जिल्हा : तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया जिल्हा: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली जिल्हा: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166. ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होणार आहे असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Last Updated : Sep 26, 2022, 8:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.