ETV Bharat / city

CSMT Heritage Building : ११०० दिव्यांनी उजळली सीएसएमटीची हेरिटेज इमारत.. 'असे' आहे कारण..

भारतीय रेल्वे ( Indian Railways ) १६ एप्रिल रोजी १७० व्या वर्षात प्रवेश करत आहे. त्यानिमित्ताने मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक अशी इमारत ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Heritage Building ) ११०० दिव्यांनी उजळण्यात आली आहे. यानिमित्ताने याच इमारतीवर ( CSMT Heritage Building ) अनोखा असा ध्वनी-प्रकाश परफॉर्मन्स शो ( Light Sound Performance Show ) सादर करण्यात येणार आहे.

११०० दिव्यांनी उजळली सीएसएमटीची हेरिटेज इमारत

author img

By

Published : Apr 15, 2022, 7:34 PM IST

मुंबई - आशियातील खंडातील पहिली ट्रेन ( First Train In Asia ) मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवारी, १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. भारतीय रेल्वे ( Indian Railways ) १६ एप्रिल २०२२ पासून देशाच्या सेवेच्या १७०व्या वर्षात प्रवेश करत आहे. भारतातील रेल्वेच्या 'पहिल्या प्रवासाच्या प्रित्यर्थ, 'आझादी' का अमृत महोत्सव', रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवसानिमित्ताने सोमवारी मध्य रेल्वे, युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या सीएसएमटीच्या हेरिटेज इमारतीवर ( Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Heritage Building ) एक अनोखा ध्वनी-प्रकाश परफॉर्मन्स शो ( Light Sound Performance Show ) सादर करणार आहे.

असा आहे इतिहास- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही भारतीय रेल्वे आणि संपूर्ण रेल्वे समूहाची शान आहे. सन १९०० मध्ये, इंडियन मिडलँड रेल्वे कंपनी मध्य रेल्वेच्या पूर्ववर्ती ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये विलीन झाली. तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर आणि अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूर ते दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आल्या. अशाप्रकारे, मुंबईद्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. G.I.P चे रेल्वेमार्ग १६०० मैल (२५७५ किमी) होते. नोव्हेंबर १९५१ मध्ये निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,१८३ मार्ग किमीवर पसरलेले आहे.

११०० दिव्यांनी उजळली सीएसएमटीची हेरिटेज इमारत
आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीतील थीम लाइटिंग सिस्टिमच्या नवीन झगमगाटाचा आनंद घेता येणार आहे.

आपला इतिहास दाखवणार- या आठवडा अखेरीस एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो आयोजित करण्यात आला आहे. हा शो नाट्यशास्त्राच्या नऊ रसांच्या विविध भावभावनांमधून आपला इतिहास दाखवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीवर रेल्वे आणि देशाच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित विविध भावनांना उजाळा देणारा हा कार्यक्रम नृत्य, नाटक, संगीत, कविता आणि स्वर सादरीकरणाद्वारे सादर केला जाईल. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीतील थीम लाइटिंग सिस्टिमच्या नवीन झगमगाटाचा आनंद घेता येणार आहे.

हेरिटेज इमारत ११०० दिव्यांनी उजळली- अलिकडच्या काळात आयकॉनिक स्ट्रक्चरला प्रकाश देण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानात बदल झाला आहे. एलईडी (LED- RGB आणि W) लाइट्सची सुधारित आवृत्ती वापरली जात आहे. जी शहराची संस्कृती आणि परंपरा यांची विविधता व्यक्त करेल. एलईडी (LED) फिटिंग्जचे तंत्रज्ञान ज्यामध्ये दशलक्षाहून अधिक एकत्रित लाइट्सच्या छटा आहेत ते स्टेशनच्या इमारतीला प्रकाश देण्यासाठी वापरले गेले आहेत. १३४ वर्षे जुने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सुमारे ११०० दिव्यांनी उजळले आहेत. या ११०० पैकी ४५० हून अधिक दिव्यांची चमक कालपरत्वे कमी झाली म्हणून हे सर्व ४५० दिवे नवीन तंत्रज्ञानयुक्त एलईडी दिव्यांसह बदलण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीवर रेल्वे आणि देशाच्या इतिहासातील विविध ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित विविध भावनांना उजाळा देणारा हा कार्यक्रम नृत्य, नाटक, संगीत, कविता आणि स्वर सादरीकरणाद्वारे सादर केला जाईल.

नवरसंगम – एक गाथा सीएसएमटी की : रेल्वे कर्मचारी असलेल्या ७० कलाकारांद्वारे भारतीय सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन केले जाणार आहे. मूळ ऑडिओ ट्रॅकही रेल्वे कलाकारांच्या टीमने तयार केला आहे. दिवे, संगीत निर्मिती आणि स्टुडिओ रेकॉर्डिंग या क्षेत्रांतील कठोर तालीम आणि व्यावसायिक इनपुटनंतर उत्पादन तयार केले गेले आहे. मध्य रेल्वे कल्चरल अकादमीच्या अंतर्गत कलाकार मुख्यालय, विभाग आणि कार्यशाळेतील सर्वसमावेशक सहभागासह सादरीकरण करणार आहेत.

हेही वाचा : ऐकावे ते नवलच! ढोल-ताशांच्या गजरात रेल्वेच्या शेवटच्या अॅम्बेसिडर कारला निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.