ETV Bharat / city

माहीम खाडीलगतच्या 1000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हालवले

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका लक्षात घेता माहीम खाडीलगतच्या 1000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत अधिक माहिती जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. माहीम येथील महानगर पालिकेच्या शाळेत रहिवाशांची तत्काळ सोय करण्यात आलीय.

nisarga cyclone in mumbai
माहीम खाडीलगतच्या 1000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हालवलं
author img

By

Published : Jun 3, 2020, 12:25 PM IST

मुंबई - निसर्ग चक्रीवादळाचा मोठा धोका लक्षात घेता माहीम खाडीलगतच्या 1000 रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत अधिक माहिती जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. माहीम येथील महानगर पालिकेच्या शाळेत रहिवाशांची तत्काळ सोय करण्यात आलीय.

माहीम खाडीलगतच्या झोपड्यांना आणि माहीम कोळीवाडा परिसराला धोका असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे होते. त्यानुसार आज सकाळपासून पालिकेची टीम सक्रिय झालीय.

रहिवाशांना महत्वाची कागदपत्रे आणि आवश्यक सामान घेऊन स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अनेक स्थानिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न पालिकेला करावे लागत आहेत. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत 200 रहिवाशांना हालवण्यात आल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

तर तासाभरात एकूण 1000 रहिवाशांना माहीमच्या पालिका शाळेत हलवण्यात येईल, असे ते म्हणाले. या रहिवाशांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.