ETV Bharat / city

मुंबईतून अपहरण झालेली 100 अल्पवयीन मुले अजूनही बेपत्ता - kidnapped babys are still missing

2020 या वर्षात तब्बल 773 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले असून आतापर्यंत केवळ 673 मुलांचा शोध मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे. मात्र अजूनही 100 अल्पवयीन मुले ही बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर 2020 या महिन्यांमध्ये मुंबई शहरात तब्बल 80 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले होते.

मुंबईतून अपहरण झालेली 100 अल्पवयीन मुले अजूनही बेपत्ता

author img

By

Published : Jan 19, 2021, 1:18 PM IST

मुंबई - मुंबई शहरामध्ये वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुंबई शहरातून अपहरण झालेल्या 100 अल्पवयीन मुलांचा अजुनही शोध लागलेला नाही.

वर्षभरात अल्पवयीन मुलांच्या अपहरणात वाढ
2020 या वर्षात तब्बल 773 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले असून आतापर्यंत केवळ 673 मुलांचा शोध मुंबई पोलिसांनी घेतलेला आहे. मात्र अजूनही 100 अल्पवयीन मुले ही बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर 2020 या महिन्यांमध्ये मुंबई शहरात तब्बल 80 अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले होते. ज्यामध्ये केवळ 59 अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यास मुंबई पोलिसांना यश आले असून अजूनही 21 मुलांचा पत्ता लागलेला नाही.

मुंबईत मूल विकणारी टोळी सक्रिय
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या कारवाई दरम्यान मुंबईत शहरांमध्ये नवजात बालक विकण्याच्या संदर्भात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. यासंदर्भात पोलिसांनी एक डॉक्टर, नर्स आणि टेक्निशियन सह नऊ जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून या टोळीने सहा लाख रुपयांपर्यंत नवजात बालक ही गरजू दाम्पत्यांना विकली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रुपाली वर्मा, निशा अहिरे, गुलशन खान, गीतांजली गायकवाड (नर्स)आरती सिंग (लॅब टेक्निशियन) व धनंजय बोगे (डॉक्टर) या आरोपींसह 3 महिलांना अटक केली आहे.

आतापर्यंत विकली आहेत 9 मुले
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1 ला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये लहान मूल विकणारी टोळी कार्यरत असून यात डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन सह काही महिलांचा समावेश असल्याचे समोर आलं होतं. या संदर्भात मुंबई पोलिसांनी लोअर परळ परिसरातून धनंजय बोगे या डॉक्टरला अटक करून त्याची चौकशी केली तेव्हा, त्याने या संदर्भात दिलेल्या माहितीवरून इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी डॉक्टर हा त्याच्या नर्स लॅब टेक्निशियन सोबत मिळून मुंबईतील झोपडपट्टी परिसरात असलेल्या गरीब कुटुंबातील विवाहित दाम्पत्यांना गाठायचा. त्यांची लहान मुले आमिष दाखवून विकायचा. यासाठी तब्बल 60 हजारांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतचा मोबदला या महिलांना दिला जात होता. मात्र हे मूल गरजू व्यक्तींना विकताना त्यांच्याकडून 5 ते 6 लाख रुपयांची रोकड घेतली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या गुन्ह्यातील नर्स गीतांजली गायकवाड हिने गेल्या 2 वर्षात 6 लहान मूल विकल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - क्रूरतेचा कळस! मध्यप्रदेशात १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून जिवंत गाडलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.