ETV Bharat / city

water cut in Mumbai : मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात - low water level in dams

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात ( water cut in Mumbai ) लागू करण्यात आली आहे. मुंबईत आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधनाकरक पाऊस पडलेला नाही. यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी ( low water level in dams )होत असून जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे.

water cut in Mumbai
water cut in Mumbai
author img

By

Published : Jun 27, 2022, 9:39 AM IST

मुंबई - पावसाळा सुरू होऊनही मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ( Water shortage crisis on Mumbaikars ) निर्माण झाले आहे. कारण मुंबईत आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात असमाधनाकरक पाऊस झाला आहे ( Unsatisfactory rainfall in dam area ) . यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होत असून जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडेपर्यंत आणि जलाशयातला पाणीसाठा मुबलक प्रमाणात निर्माण होईपर्यंत पाण्याचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर आहे. यासाठी आज (सोमवार दिनांक २७ जून २०२२) पासून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात ( water cut in Mumbai ) लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा - Shivsenas rebel of MLAs petition : एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेनेची लढाई सर्वोच्च न्यायालयात, दोन दिग्गज वकील मांडणार बाजू

९.३४ टक्के जलसाठा - यंदाचा पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी ( low rainfall in dam area ) झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा यंदा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयामध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत आज या सर्व सात जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ३५ हजार १५६ दशलक्ष लिटर म्हणजे ९.३४ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्याच दिवशी हा जलसाठा १६.२५ टक्के इतका होता. त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -Sunil Raut on Shivsena : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, कापला तरी प्रतारणा करणार नाही, सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण

१० टक्के पाणी कपात - दमदार पाऊस झाला नाही तर मुंबईकरांना आणखी पाणी कपातीला सामोर जाऊ लागू शकते. त्याशिवाय, हीच परिस्थिती यापुढेही सुरू राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता, दमदार पाऊस होऊन मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज (सोमवार दिनांक २७ जून २०२२) पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना जेवढा पाणीपुरवठा केला जातो, तिथे देखील १० टक्के पाणी कपात लागू राहणार आहे. त्यापार्श्वभूमीवर दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा व महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मुंबईकरांना करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात सर्वदूर पाऊस कमी अधिक प्रमाण हजेरी लावत आहे. येत्याकाळात मुंबईकरांना देखील समाधानकारक पाऊस पहायला मिळेल आणि पाणीकपातीची टांगती तलवार जाईल यात काही शंका नाही. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाने मुंबईकर चिंतेत ( Mumbaikars worried ) सापडले आहेत. गृहीनींसमोर घरगुती पाणी वापराचे आणि साठवणूकीचे मोठे आव्हान समोर राहिले आहे.

हेही वाचा - Live Maharashtra Political crisis :डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका- संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.