कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी "राजं.. मला वाचवा ! पन्हाळा बुरुज (Panhala fort conservation)आणि ऐतिहासिक वास्तूंची दुरावस्था" (Poor condition of historical buildings) या आशयाखाली 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर अनेक दुर्गप्रेमी संस्था (Fortress loving organization) तसेच तरुणांकडून (youth initiative) पन्हाळा येथे जनजागृती केली जात आहे. शिवाय जोपर्यंत पन्हाळा गडाच्या संवर्धनाची सुरुवात होत नाही. तोपर्यंत विविध मार्गाने आंदोलनाचा इशारा सुद्धा आता देण्यात आला आहे.
एक होता पन्हाळगड ! : दरम्यान, 'एक होता पन्हाळागड' (Panhala fort conservation) अशा टॅगलाईन खाली काही दुर्गप्रेमींनी पन्हाळा गडावर येऊन, हातात फलक घेऊन जनजागृती केली. पन्हाळा गड ढासळत चालला आहे त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. संपूर्ण गडच ढासळल्यावर आम्हाला 'एक होता पन्हाळागड' असेच पुढच्या पिढीला सांगावे लागणार आहे, असेही या दुर्गप्रेमींनी म्हंटले. याकडे प्रशासन लक्ष देणार का? असा सवाल करत संवर्धन होत नाही तोपर्यंत आम्ही अनोख्या पद्धतीने आंदोलन करतच राहणार असल्याचे दुर्गप्रेमींनी म्हंटले.
गड संवर्धनाची मोहीम हाती : दरम्यान, अनेक मोठ्या संघटना, पक्षांचे पदाधिकारी पन्हाळा गडाची ढासळलेली अवस्था पाहून गप्प आहेत. राजकारणासाठी शिवरायांच्या नावाचा सर्रासपणे वापर केला जाईल. मात्र तोच शिवरायांचा गड वाचावा. यासाठी एकही जण पुढे येऊन प्रश्न मांडत नाहीत. अशीच प्रतिक्रिया दुर्गप्रेमी तसेच तरुणांमधून येत आहे. त्यामुळेच आता अनेक तरुण मुलं, दुर्गप्रेमी यांनी पन्हाळा वाचविण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने विविध मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल. अशा पद्धतीने चळवळ उभी करणार असल्याचे म्हंटले आहे. शिवाय जोपर्यंत आता संबंधित प्रशासनाकडून काहीही ठोस निर्णय येत नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
वेळीच लक्ष देण्याची गरज : महाराष्ट्रातील महत्वाच्या गडकिल्ल्यांपैकी एक महत्वाचा गड असलेल्या पन्हाळ्याकडे आता प्रशासनासह पुरातत्व विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अनेक ऐतिहासिक बुरुज आणि वास्तू दिवसेंदिवस ढासळत चालल्या आहेत. तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. नुकतेच चार दरवजा जवळील नेबापुर व मंगळवार पेठ कडे जाण्याच्या पायवाटेच्या मार्गावरील ऐतिहासिक तटबंदीचा काही भाग कोसळला. तर तटबंदीला जागोजागी भेगाही पडल्या आहेत. अनेक ढासळलेल्या वास्तू आहे त्याच परिस्थितीत असून साधा एक दगडही प्रशासनाकडून उचलण्यात आला नाहीये. त्यामुळे 'पन्हाळा गड वाचवा' असेच म्हणण्याची वेळ आता आल्याच्या भावना नागरिकांमधून उमटत आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने याकडे लक्ष घालून डागडूजी करून पन्हाळा गडाचे संवर्धन करण्याची गरज आहे.
गडावरील महत्वाच्या वास्तू नामशेष : दरम्यान, पन्हाळा किल्ल्याला महाराष्ट्रात आणि मराठा साम्राज्याच्या एक गौरवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच पन्हाळा गडावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे अनेकदा मोठ्याप्रमाणात गडावरील वास्तूंची, बुरुजांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता सुद्धा दोन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने, नाक्याजवळील चारदरवजाच्या जवळील तटबंदीच्या भिंतीचा काही भाग काल कोसळला. उर्वरीत अवशेषापैकी पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर, मंगळवार पेठ गावाकडे जाणाऱ्या पायवाटेवरील शिलाहार भोज राजाच्या काळात बांधली गेलेली ही भिंत आहे. या जवळच गत वर्षी मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाल्याने रस्ता खचला होता. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात भिंतीना तडे गेले आहेत. पुरातत्व विभागाने या ठिकाणाची पहाणी पण केली होती. पण निधी अभावी दुरुस्ती होवु शकली नसल्याचे सांगण्यात येते.
सज्जा कोटी वास्तूला धोका : पन्हाळा गडावर सज्जा कोटी वास्तूला सुद्धा आता मोठया प्रमाणात भेगा पडल्या आहेत. बांधकाम मजबूत असल्याचे दिसत असले तरी, त्यावर झाडवेली वाढल्याने जागोजागी भेगा पडू लागल्याने धोका निर्माण होत आहे. काही वर्षापासून तर या वास्तूच्या दोन्ही बाजू ढासळल्या आहेत. त्याची आजपर्यंत कोणत्याही प्रकारे डागडुजी केली नाहीये. त्यामुळे पन्हाळगड सुशोभीकरणासाठी शासन कोटीचा निधी उपलब्ध करून गडावर सुशोभीकरण केल्याचे भासवत असले तरी दुसरीकडे ऐत्याहासिक वास्तू पडून नामशेष होऊ लागल्या असल्याने, इतिहास प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पायथ्याशी राहणार्या गावांना धोका: जोरदार पडणाऱ्या पावसाने पन्हाळ्याच्या तटबंदीचा व जिर्ण भिंतींचा थोडा थोडा भाग दरवर्षी कोसळत चालला आहे. तसेच चारदरवाजा परिसरात ढासळलेल्या भागात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. याकडे पुरातत्व विभागाने व प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पायथ्याशी राहणार्या, नेबापूर, सोमवारपेठ, इब्राहिमपूर, इत्यादी गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तर नवीन बांधकाम करण्यात आलेल्या जिओग्रेट बांधकामावरून पडणाऱ्या धबधबासदृष्य पाण्यामध्ये ड्रेनीज मिश्रीत पाणी सोडले जाते. त्याचा त्रास मंगळवार पेठेत राहणार्या लोकांना होत असल्याच नागरिकांचे म्हणणे आहे. तर गडावरून येणार्या पाण्यामुळे नियमित त्रास होत असल्याचे पायथ्याशी राहणार्या नागरीकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: प्रदूषित हवेत श्वासोच्छवास करणे मज्जासंस्थांसाठी धोकादायक, स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो