ETV Bharat / city

जिल्हाधिकारी कार्यालयसह अनेक कार्यालयांनी थकवली कोट्यवधींची पाणीपट्टी

शासकीय कार्यालयांची कोट्यवधींची पाणीपट्टी थकबाकी आहे; या मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुद्धा समावेश आहे. आशा सर्वच कार्यालयांना तत्काळ पाणीपट्टी भरण्याबाबतच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच काही कार्यालयाचा पाणी पुरवठा खंडीत करण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात येत आहे.

अनेक कार्यालयांनी थकवली कोट्यवधींची पाणीपट्टी

author img

By

Published : Jan 28, 2021, 10:16 AM IST

Updated : Jan 28, 2021, 11:24 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिका पाणी पुरवठा विभागाच्यावतीने पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत रेल्वे विभागाकडील 4 कनेक्शन, समाज कल्याण कार्यालयाचे 1 कनेक्शन, विभागीय वन कार्यालय यांचे 1 कनेक्शन, आय.टी. पार्क यांचे 1 कनेक्शन खंडीत करण्यात आले आहे. शहरात अजूनही अनेक कार्यालये आहेत, ज्यांची लाखो रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुद्धा समावेश आहे. आशा सर्वच कार्यालयांना तत्काळ पाणीपट्टी भरण्याबाबतच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असे नोटीसद्वारे म्हंटले आहे.

अनेक कार्यालयांनी थकवली कोट्यवधींची पाणीपट्टी
काही शासकीय कार्यालयांची थकबाकी पुढीलप्रमाणे :1) सी.पी.आर.कार्यालय (84202227)2) 12 ग्रामपंचायती (69464927)3) रेल्वे विभाग (20553188)4) पाटबंधारे, वारणा विभाग (9859731)5) सार्वजनिक बांधकाम कार्यालय (7177461)6) शिवाजी विद्यापीठ कार्यालय (6638696)7) पाटबंधारे पंचगंगा (6305933)8) जिल्हाधिकारी कार्यालय (2489081)9) सी.पी.आर.अधिष्ठाता (2023937)10) जिल्हा परिषद कार्यालय (1853312)11) टेलिफोन विभाग (1617361)

या पूर्वीही पत्रव्यवहारातून सूचना-

यासह अनेक शासकीय कार्यालयांचाही थकबाकी मध्ये समावेश आहे. या सर्व शासकीय कार्यालयांकडून जवळपास 22 कोटी थकबाकी आहे. ही थकीत रक्कम त्वरीत भरणेबाबत पाणी पुरवठा कार्यालयाकडून यापूर्वी वारंवार लेखी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तसेच यापूर्वी महानगरपालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांचेमार्फत संबंधित विभाग प्रमुख यांना अर्धशासकीय पत्र देण्यात आले आहे. यामध्ये संबंधीत कार्यालयांनी थकीत रक्कम भरणा करण्यात यावी अन्यथा पाणी पुरवाठा जोडणी खंडीत करण्यात येईल, असे लेखी कळविण्यात आलेले आहे.

या व्यतिरिक्त जल अभियंता नारायण भोसले यांनी संबंधित विभाग प्रमुख यांची समक्ष भेट घेऊन थकीत रक्कम भरणेबाबत विनंती केली आहे. परंतु संबंधित कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने या शासकीय कार्यालयाकडील नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Last Updated : Jan 28, 2021, 11:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.