ETV Bharat / city

Kolhapur Sweters : कोल्हापूरातील बाजारात उबदार कपडे दाखल; मात्र अल्प प्रतिसादाने व्यावसायिक गारठले

कोल्हापुरातील बाजारात नागरिकांसाठी स्वेटर, शाल, कानटोपी यासारखे अनेक उबदार कपडे खरेदीसाठी दाखल झाले असून येथे ग्राहकांसाठी व्हरायटी दाखल झाली आहे. मात्र, ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा तसा मिळत नसल्याने व्यावसायिकच गारठले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Kolhapur Sweters news
Kolhapur Sweters news
author img

By

Published : Dec 5, 2021, 7:23 PM IST

Updated : Dec 5, 2021, 9:00 PM IST

कोल्हापूर - दिवाळीचा सण संपतानाच थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. अवकाळी पाऊस आणि त्यात सकाळी पडणाऱ्या थंडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांसाठी बाजारात स्वेटर, शाल, कानटोपी यासारखे अनेक उबदार कपडे खरेदीसाठी दाखल झाले असून येथे ग्राहकांसाठी व्हरायटी दाखल झाली आहे. मात्र, ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा तसा मिळत नसल्याने व्यावसायिकच गारठले असल्याचे पाहायला मिळत आहे.

आकर्षक डिझाइनमध्ये स्वेटर उपलब्ध -

दरवर्षी साधारण दिवाळीनंतर थंडी पडण्यास सुरुवात होते. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील स्वेटर मार्केट येथे बाहेरील राज्यातील अनेक विक्रेते येत आपला माल विकण्यास सुरुवात करतात. यात प्रामुख्याने नेपाळी, तिबेटीयन, कर्नाटक या राज्यातून व्यापारी जास्त येत असतात. हे स्वेटर मार्केट गेल्या अनेक वर्षांपासून येथे चालू आहे. थंडीपासून संरक्षण करणारे तिबेटीयन, गुलाबी, आकाशी, लाल असे विविध स्वेटर, मफलर आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध असतात म्हणून स्वेटर घ्याचे म्हणले की ग्राहकांची पहिली पसंतीदेखील याच दुकानांना असते.

बदलत्या हवामानामुळे ग्राहकांची खरेदीकडे पाठ -

वर्षातील फक्त 4 महिने चालणारा हा व्यवसाय गेली 2 वर्षे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बंद होता. त्यामुळे काही व्यापारी येथे येऊ शकले नव्हते. मात्र, या वर्षी सर्व व्यापाऱ्यांनी गेल्या 1 महिन्यापासून पुन्हा आपली दुकाने चालू करत स्वेटरचे अनेक रंगीबेरंगी व्हरायटी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. परंतु बदलत्या हवामानामुळे गेल्या 2-3 आठवड्यापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे थंडी कमी होत आहे. या हवामानामुळे अनेक ग्राहक बुचकळ्यात पडले आहेत. स्वेटर घ्याचा की रेनकोट तर काही ग्राहकांनी स्वेटर खरेदीकडे पाठ फिरवली असल्याची खंत येथील व्यापाऱ्यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना व्यक्त केली.

पर्यटकांची आवर्जून थांबून खरेदी -

कोल्हापूर जिल्हा हा पर्यटन आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचा असल्याने अनेक पर्यटक कोल्हापुरात येत असतात. पर्यटक शहरात येताच पर्यटकांचे लक्ष या दुकानाकडे जाते आणि समोर अडकवलेले रंगीबेरंगी स्वेटर्स डोळ्याला भुरळ पाडते. यामुळे अनेक पर्यटकदेखील येथे खरेदीसाठी थांबतात. तसेच शहरातील नागरिक ही येथे आवर्जून थांबत असतात.

या ट्रेण्डच्या स्वेटरची मागणी -

यंदा स्वेटरचे भावही काही प्रमाणात वाढले आहेत. यंदा स्वेटरमध्ये स्वेटशर्ट हुडी, झिपर, कार्डिगन, लोकरीचं स्वेटर, यांसारखे विविध प्रकार बाजारात आले असून यांची किंमत ३५० ते ८०० पर्यंत आहे. त्याशिवाय या कोल्हापूरच्या स्वेटर बाजारात मंकी कॅप, लोकरीची कानटोपी, मफलर, पॉप-पॉम हॅट, रिब-नाईट हॅट, यांसारखे विविध कानटोपीचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. तर दुसऱ्या बाजूला शाळा देखील चालू झाल्याने लहान मुलांसाठीही ट्रेंडी स्वेटरला पालक वर्गातून काही प्रमाणात मागणी होत आहे.तर कोल्हापुरात साधारण जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत थंडी असते. तर उरलेल्या 2 महिन्यात काही माल विकला जाईल, अशी अपेक्षा येथील व्यापाऱ्यांनी ठेवली आहे.

हेही वाचा - Raosaheb Danve : मायचं दूध पिलेले असाल तर माझा भ्रष्टाचार काढून दाखवा; रावसाहेब दानवेंचं खुलं आव्हान

Last Updated : Dec 5, 2021, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.