ETV Bharat / city

Vinayak Raut in Kolhapur : फावडा घ्या नाहीतर कुदळ घ्या, शिवसेनेला फरक पडत नाही - विनायक राऊत

आज भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट (Dapoli Resort) तोडण्यासाठी दापोलीला रवाना झाले. यावेळी त्यांनी एक प्रतिकात्मक हातोडाही सोबत घेतला आहे. मात्र, कुणी हातोडा आणू द्या, कुणाला कुदळ, कोणाला फावडा जे घ्याचे आहे ते घ्या, पण हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही, तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार, असे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले.

author img

By

Published : Mar 26, 2022, 5:37 PM IST

Updated : Mar 26, 2022, 6:45 PM IST

Vinayak Raut
खासदार विनायक राऊत

कोल्हापूर - राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनची शुक्रवारी सांगता झाली. या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनाही तुरुंगात टाकले जाणार असे सांगितले होते. त्यातच आज भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अनिल परब यांचे दापोली येथील रिसॉर्ट (Dapoli Resort) तोडण्यासाठी दापोलीला रवाना झाले. यावेळी त्यांनी एक प्रतिकात्मक हातोडाही सोबत घेतला आहे. मात्र, कुणी हातोडा आणू द्या, कुणाला कुदळ, कोणाला फावडा जे घ्याचे आहे ते घ्या, पण हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा दिल्लीच्या तख्तासमोर नमणारा नाही, तो लढतही राहणार आणि जिंकतही राहणार, असे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) म्हणाले. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. तसेच नितेश राणे आणि निलेश राणे हे संपलेले गणित आहे, त्यांना आम्ही फार किंमत देत नाही, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार विनायक राऊत

शिवसेनेला फरक पडत नाही : भाजप नेते किरीट सोमय्या हे आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला आहे. मंत्री परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून किरीट सोमय्या आज दापोलीकडे रवाना झाले आहेत. मात्र, याला खासदार विनायक राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. कोणाला हातोडा घ्यायचा आहे, कोणाला कुदळ घ्यायची आहे, कोणाला फावडा घ्याचा आहे घेऊद्या शिवसेनेला काही फरक पडत नाही. हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा आहे. हा दिल्लीच्या तख्तासमोर नमनारा नाही. तो लढत राहू आणि जिंकतही राहू, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांना नितेश राणे यांनी समर्थन केले आहे. यावर बोलतानाही विनायक राऊत म्हणाले, नितेश राणे आणि निलेश राणे हे संपलेले गणित आहे, आम्ही त्यांना फार किंमत देत नाही.

सीमा प्रश्नावर भाजपचे दुटप्पी धोरण : विधानसभेमध्ये महारष्ट्र कर्नाटक सीमा भागावर निषेधाचा ठराव मांडण्यात आला. यावर बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे आणि गेल्या कित्येक वर्षांपासून सीमाभागातील मराठी जनतेवर भरपूर अन्याय, अत्याचार सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे विधानसभेत केलेला निषेधाचा ठराव योग्यच आहे. आम्ही देखील संसदेत याबाबत पत्र दिले, त्यावेळी भाजपने त्यावर सही करण्यास नकार दिला. यावरून भाजपचे सीमाभागातील मराठी माणसाबाबत असलेले दुट्टपी धोरण दिसून येते.

Last Updated : Mar 26, 2022, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.