कोथरूड मतदारसंघात अमोल बालवडकर यांचं मोठं शक्तिप्रदर्शन; नागरिकांना दिला प्रमुख पाहुण्याचा मान - Amol Balwadkar - AMOL BALWADKAR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 6, 2024, 5:45 PM IST
पुणे : कोथरूड मतदारसंघाचे भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांनी बालेवाडी येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी जवळपास 20 ते 25 हजार नागरिक उपस्थित होते. मी इच्छुक उमेदवार आहे म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून माझ्यावर तसेच माझ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला. तर अमोल बालवडकर यांनी आज बालेवाडी येथे मोठं शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मतदार संघातील घरकाम करणारे, वडापाव विकणारे, कामगार, कष्टकरी, तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अमोल बालवडकर म्हणाले की, "कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी जेव्हा इच्छुक झालो तेव्हापासून आमच्या पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे कार्यक्रमाला येत नाहीत. लोकसभेत पक्षाचं काम करत असताना जनतेत गेलो तेव्हा लोक म्हणाले की, भाऊ तुम्हाला विधानसभा निवडणूक लढायची आहे. मग मी पक्षाकडं उमेदवारी मागितली. पक्षाच्या नेत्यांना सांगितलं की, मला माहित आहे कोणाला उमेदवारी मिळणार आहे. पण मला इच्छुक म्हणून राहु द्या. उद्या निवडणुकीत मी तुमचंच काम करणार आहे. पण जेव्हा मी इच्छुक झालो तेव्हा आमच्याच पक्षाचे नेते म्हणाले तू इच्छुक कसा राहिला, आत्ता तुला पक्षातून काढून टाकणार आहे. मी काय गुन्हा केला का, मी तर फक्त इच्छुक आहे म्हणून माझ्या कार्यक्रमाला यायचं नाही. कोणालाही पाठवायच नाही असं सुरू आहे. तरी मी आज माझ्या कोथरूड मतदारसंघातील मायबाप जनतेलाच प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आहे.