कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा हा जागतिक पर्यटन क्षेत्रांच्या यादीमध्ये आणण्याच्या उद्देशाने पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे 'पर्यटन आराखड्याची' आयोजन करण्यात येत आहे. याबाबत सतेज पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली. आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांच्या आयोजनाबाबत माहिती दिली.
जागतिक दर्जाची ठिकाणे
पर्यटनाच्या दृष्टीने गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, वारसा स्थळांनी तसेच खाद्यसंस्कृतीने परिपूर्ण कोल्हापूरात जागतिक दर्जाची अनेक ठिकाणे आहेत. तसेच हा जिल्हा किल्ले पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे, वारसा स्थळे, संग्रहालये, पुरातत्व ठिकाणे, जंगले, वनराई, जैवविविधता, कला, क्रीडा, सांस्कृतिक, उत्सव, शैक्षणिक, जल पर्यटन , ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन, साहसिक पर्यटन, औद्योगिक पर्यटन, हस्तकला, खाद्यसंस्कृती या सर्वानी परिपूर्ण असल्याचेही सतेज पाटील म्हणाले.
26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरला विविध कार्यक्रम
जागतिक पर्यटन दिनानिमित्त 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या दरम्यान विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने 27 सप्टेंबरला जिल्हा प्रशासन व विविध संस्था यांच्यामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचबरोबर 26 सप्टेंबर या दिवशी 306 वर्षांपूर्वी करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी अंबाबाई च्या मूर्तीची पुनः प्राणप्रतिष्ठापना झाली होती. या उपक्रमाची सुरूवात चित्रकार व शिल्पकारांच्या प्रात्यक्षिकाने होईल.
करवीर निवासिनी वर्धापन सोहळा
यात डेस्टिनेशन कोल्हापूर लोगोचे अनावरण, जिल्हा पर्यटन वेबसाईट, नकाशा, यांचे अनावरण तसेच निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफि स्पर्धा यांचे अनावरण, कोल्हापूर उत्सवांचे वेळापत्रक प्रकाशन, पर्यटन विकासासंदर्भात ऑनलाईन व्याख्याने, बाईक रॅली, दुर्ग भ्रमंती, जंगल भ्रमंती, ग्राम भ्रमंती, जल पर्यटन, कृषी पर्यटन व साहस पर्यटनाचे कार्यक्रम, स्वच्छता अभियान, हेरिटेज समिती तर्फे व्हीडिओ प्रकाशन, हस्तकला प्रात्यक्षिक, ऑफ रोड रॅली, हेरिटेज वॉक आदी उपक्रम यात राबविण्यात येईल.
मान्यवरांचा सहभाग
या उपक्रमामध्ये जिल्हा प्रशासना सोबत क्रेडाई, हॉटेल मालक संघ, हेरिटेज कमिटी, पर्यटन महामंडळ, पुरातत्व विभाग, ट्रॅव्हल एजन्ट असोसिएशन, देवस्थान समिती, हिल रायडर्स अडव्हेंचर फौंडेशन, कोल्हापूर जिल्हा माऊंटनिअरिंग व अलाईड स्पोर्ट्स असोसिएशन, टूर ऑपरेटर्स, निर्मिती ग्राफिक्स यांचा सहभाग असेल.
हेही वाचा - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू