कोल्हापूर - देशभरात दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी बालदिन (Children's Day) साजरा करण्यात येतो. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती असते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी भारतात बालदिन साजरा करण्यात येतो. बालदिवसाच्या निमित्ताने देशभरातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रम, खेळांचे आयोजन करण्यात येत असते. अनेक ठिकाणी मुलांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात. यासोबतच या दिवशी मुलांना बाल हक्कांबाबत जागरूक केले जाते. मुलांसाठी शिक्षण, आरोग्य, संस्कृती हे फारच महत्वाचे असते कारण हीच मुले आपल्या देशाचे भविष्य घडवणार असतात.
बालदिनाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातील दोन बहिणींनी केलेल्या विक्रमाबाबत आपण आढावा घेणार आहोत. कोण आहेत या चिमुकल्या बहिणी ज्यांनी आगळा-वेगळा असा विश्वविक्रम केला आहे ? आणि काय आहे हा विक्रम ? हे जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी या विशेष मुलाखतीतून..
गावडे बहिणींचा आगळावेगळा विक्रम चौथीत शिकणाऱ्या अनुप्रियाने केला हा विक्रम - कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील गिरगाव या छोट्याशा गावातील अनुप्रिया अमितकुमार गावडे हिने राष्ट्रसंघाचे बालहक्क अनुसंधान यातील 54 कलमे 4 मिनिटे 11 सेकंदात तोंडपाठ करून विश्वविक्रम केला आहे. तिने गेल्यावर्षीच भारतीय घटनेतील 35 कलमे तसेच उपकलमे केवळ 6 मिनिटे 11 सेकंदात तोंडपाठ करून विक्रम केला होता. त्याची अनेक ठिकाणी नोंद झाली आहे. यासाठी तिला भारत भूषण ग्रँडमास्टर किताब सुद्धा प्रदान करण्यात आला आहे. तिच्या विक्रमानंतर संपूर्ण जिल्ह्यात तिचे कौतुक होत आहे. यापुढे अशाच प्रकारे अनेक वेगवेगळे विक्रम करण्याची तिचा मानस आहे. अनुप्रिया सद्या इयत्ता चौथीमध्ये शांतिनिकेतन शाळेत शिकत आहे. गावडे बहिणींचा आगळावेगळा विक्रम अनुप्रिया आणि अनोज्ञाच्या रेकॉर्ड ची 'या' ठिकाणी सुद्धा नोंद -
अनुप्रिया आणि अनोज्ञा अमितकुमार गावडे यांच्या आगळ्या वेगळ्या विक्रमांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन सहीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड एक्सलन्स, इंडिया स्टार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यासह अन्य 15 रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली आहे. एवढेच नाही तर अनुप्रियाने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड परीक्षेत जगात आठवा तसेच आंतरराष्ट्रीय सामान्यज्ञान परीक्षेत अकरावा क्रमांक पटकाविला आहे. या दोघींना तिच्या शाळेतील शिक्षकांसोबतच तिच्या आई-वडिलांचे खूप मोठे मार्गदर्शन लाभले आहे.
गावडे बहिणींचा आगळावेगळा विक्रम मोठी बहिणी अनोज्ञा गावडे हिने सुद्धा केला आगळा-वेगळा विक्रम -
आपली छोटी बहिण अनुप्रिया गावडे गेल्यावर्षी राज्यघटनेतील 34 कलम आणि उपकलमे तोंडपाठ करून विक्रम केला होता. तिच्या विक्रमानंतर आठवीमध्ये शिकणाऱ्या तिच्या मोठ्या बहिणीने म्हणजेच अनोज्ञा गावडे हिने सुद्धा एक विश्वविक्रम केला आहे. अनोज्ञा गावडेने क्रिकेटमधील विविध विश्वविक्रम तोंडपाठ केले आहेत. यामध्ये एकदिवसीय क्रिकेट, टी20 क्रिकेट, आयपीएल, कसोटी असे अनेक रेकॉर्ड तिने तोंडपाठ केले असून तिने सुद्धा हे केवळ 4 मिनिटे 11 सेकंदात पठण करून विक्रम केला आहे. तिच्या या रेकॉर्डची एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून तिला सुद्धा ग्रँडमास्टरचा किताब बहाल करण्यात आला आहे. या दोन्ही बहिणींच्या विक्रमांची सद्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आजवर या दोन्ही बहिणींनी शालेय स्थरावरील अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा विजेतेपद पटकावले आहे.
गावडे बहिणींचा आगळावेगळा विक्रम आई डॉ. अक्षता गावडे यांचे सुद्धा दोघींना रेकॉर्डसाठी मार्गदर्शन - लहानपणापासूनच शाळेत हुशार असलेली अनुप्रिया नेहमीच आपल्या आईला म्हणजेच डॉ. अक्षता गावडे यांना मला संविधान पाठ करायचे असल्याबाबत बोलून दाखवायची. यासाठी डॉ. गावडे यांनीही तिला पहिली पासूनच मार्गदर्शन करायला सुरुवात केली. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये तिने तब्बल 35 कलमे आणि उपकलमे पाठ करून बोलून दाखवू लागल्याने आई वडिलांना सुद्धा आश्चर्य वाटले. त्यामुळे तिच्या या विक्रमाची अनेक ठिकाणी नोंद झाली असून आम्हाला तिचा अभिमान असल्याचे तिच्या आईवडिलांना म्हटले आहे.