ETV Bharat / city

BREAKING : कोल्हापूरमधील रेल्वे स्टेशनवरील रेल्वेला आग; एक डबा जळून खाक

author img

By

Published : Dec 6, 2021, 2:52 AM IST

Updated : Dec 6, 2021, 11:12 AM IST

कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशनवरील सर्व्हिसिंग वर्कशॉप येथे रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग ( FIRE AT RAILWAY STATION IN KOLHAPUR ) लागली होती. काल रात्रीच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमनचे तीन बंब तसेच, जीवन रक्षक आपात्कालीन सेवा संस्थेचे जवान आदींच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीमध्ये रेल्वेचा एक डबा जळून खाक झाला आहे.

train Fire at railway station in Kolhapur
रेल्वे आग कोल्हापूर रेल्वे स्टेशन

कोल्हापूर - कोल्हापूर येथील रेल्वे स्टेशनवरील सर्व्हिसिंग वर्कशॉप येथे रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग ( FIRE AT RAILWAY STATION IN KOLHAPUR ) लागली होती. काल रात्रीच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमनचे तीन बंब तसेच, जीवन रक्षक आपात्कालीन सेवा संस्थेचे जवान आदींच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आगीमध्ये रेल्वेचा एक डबा जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही समजू शकलेले नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

रेल्वेला आग लागल्याचे दृश्य

तासाभरानंतर आगीवर नियंत्रण :

कोल्हापूरच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज रेल्वे स्थानकावरती उभ्या असणाऱ्या रेल्वेच्या एका डब्याला रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. ही बाब रेल्वे स्थानक परिसरातील नागरिकांना लक्षात आली. येथील सर्व्हिसिंग वर्कशॉपच्या रुळावर ही रेल्वे थांबून होती. मात्र अचानक रात्रीच्या सुमारास रेल्वेच्या एका डब्याला आग लागली. बघता बघता आगीने भीषण रूप प्राप्त झाले. याबाबत तात्काळ येथील अग्निशमन दलाला काळविल्यानंतर अग्निशमनचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले. कोल्हापूर अग्निशामक दलाच्या जवानांसह रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तसेच 14 जीवन रक्षक आपत्कालीन सेवा संस्थेच्या जवानांनी यावरती तासाभराच्या प्रयत्नानंतर यश मिळवले आहे. पण रेल्वेचा एक डब्बा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा अध्याप शोध लागला नाहीये.

हेही वाचा - Kolhapur Sweters : कोल्हापूरातील बाजारात उबदार कपडे दाखल; मात्र अल्प प्रतिसादाने व्यावसायिक गारठले

Last Updated : Dec 6, 2021, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.