कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूमध्येही खूपच वाढ होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंगळवारी कोल्हापुरात तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला. तर 24 तासात 717 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 556 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे.
सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 875 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 64 हजार 634 इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 64 हजार 634 वर पोहोचली आहे. त्यातील 54 हजार 613 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 875 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 116 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 80 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2332 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4576 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 35098 रुग्ण
51 ते 70 वर्ष -18018 रुग्ण
71 वर्षांवरील - 4530 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 64 हजार 634 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 1240
2) भुदरगड - 1616
3) चंदगड - 1415
4) गडहिंग्लज - 2001
5) गगनबावडा - 226
6) हातकणंगले - 6651
7) कागल - 1958
8) करवीर - 7302
9) पन्हाळा - 2422
10) राधानगरी - 1463
11) शाहूवाडी - 1772
12) शिरोळ - 3140
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 9159
14) कोल्हापुर महानगरपालिका - 20767
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3502