कोल्हापूर : फास्ट टॅगच्या नादात सुप्रसिद्ध कवी संदीप खरे यांना सुद्धा कोल्हापूरातल्या किणी टोल नाक्यावर मनस्ताप झाला. फास्ट टॅग स्कॅन झाली नाही त्यामुळे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी डबल टोल भरायला सांगितला, मात्र त्याला विरोध करत संदीप खरे यांनी फास्ट टॅग व्यवस्थित स्कॅन करायला भाग पाडले. यामध्ये विनाकारण वेळ गेल्याने संतापलेल्या खरे यांनी फेसबुक वर व्हिडिओ पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय 'टोल नाका आला की टेंशन येते' असे कॅप्शन सुद्धा व्हिडिओला दिले आहे.
कवी संदीप खरे यांच्याशी किणी टोल नाका कर्मचाऱ्यांनी घातली हुज्जत - MNS leader Rupali Patil also had a bad experience
टोल नाक्यावरील फास्ट टॅग स्कॅन न झाल्याने किणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी कवी संदीप खरे याच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मनसे नेत्या रुपाली पाटील यांनादेखील काही दिवसापूर्वी असाच वाईट अनुभव आला होता.