ETV Bharat / city

Navratri 2022 : भटक्या जमातीतील पहिल्या तुरुंग अधिकारी मिरा बाबर यांचा खडतर प्रवास - travelling from village to village

आपल्या परिस्थितीशी दोन हात करत अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. यामध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे. नवरास्त्रोत्सवाच्या ( Navratri 2022 ) निमित्ताने आपण आज अशाच एका महिलेचा प्रवास जाणून घेणार आहोत ज्या जन्मापासूनच आई वडीलांसोबत गावोगावी फिरुन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवत ( travelling from village to village ) होत्या. त्यांच्या या संघर्षमय प्रवासातून सुद्धा त्यांना शिकण्याची संधी भेटली आणि त्या संधीचे त्यांनी सोनं करून ( took advantage of education opportunity ) दाखवले. मीरा बाबर असे या महिलेचे नाव आहे, ज्या आता कोल्हापूरातील कळंबा इथं अथक प्रयत्नांनी कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून काम करत आहेत.

Navratri 2022
Navratri 2022
author img

By

Published : Sep 26, 2022, 10:32 AM IST

Updated : Sep 26, 2022, 1:05 PM IST

कोल्हापूर - आपल्या परिस्थितीशी दोन हात करत अनेकांनी यशाची शिखरे गाठली आहेत. यामध्ये पुरुषांसह महिलांचाही समावेश आहे. नवरास्त्रोत्सवाच्या ( Navratri 2022 ) निमित्ताने आपण आज अशाच एका महिलेचा प्रवास जाणून घेणार आहोत ज्या जन्मापासूनच आई वडीलांसोबत गावोगावी फिरुन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवत ( travelling from village to village ) होत्या. त्यांच्या या संघर्षमय प्रवासातून सुद्धा त्यांना शिकण्याची संधी भेटली आणि त्या संधीचे त्यांनी सोनं करून ( took advantage of education opportunity ) दाखवले. मीरा बाबर असे या महिलेचे नाव आहे, ज्या आता कोल्हापूरातील कळंबा इथं अथक प्रयत्नांनी कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून काम करत आहेत. पाहुयात कोण आहेत 'मीरा बाबर' आणि त्यांचा संघर्षमय प्रवास ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांच्या या विशेष रिपोर्ट च्या माध्यमातून.

मिरा बाबर

पहिली महिला तुरुंगाधिकारी - खरंतर नवरात्रोत्सवाच्या ( Navratri Festival ) पार्श्वभूमीवर दरवर्षी आपण विविध महिलांच्या त्यांच्या संघर्षमय प्रवासाच्या स्टोरीज वाचत असतो. 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून सुद्धा आज आपण अशाच एका नाथपंथी डवरी, गोसावी समाजातील महिलेच्या थक्क करणाऱ्या प्रवासावर प्रकाश टाकणारा आहोत ज्या त्यांच्या समाजातून पुढे येऊन शिक्षण घेऊन चक्क तुरुंगाधिकारी बनल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात जरी त्यांचं मूळ गाव असलं तरी त्यांचा जन्म मात्र वेगळ्याच राज्यात झाला. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील लोक हे आपला उदरनिर्वह करण्यासाठी भिक्षा मागत संपूर्ण देशभरात फिरत असतात. आजही अनेक ठिकाणी गाडी मध्ये मंदिर तयार करून घरोघरी जाऊन भिक्षा मागत या समाजातील लोकं आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. आपल संपूर्ण आयुष्य भटकंती करत असल्याने या समाजातील मुलं सुद्धा शिक्षणापासून वंचित राहतात. अशा या समाजात मिरा बाबर यांचा जन्म झाला.

मीरा बाबर यांच्या जन्माची गोष्ट - मिरा बाबर यांच्यासह एकूण 8 भावंडे त्यामध्ये 5 भाऊ आणि 2 बहिणी तर एका भावाचा लहान असतानाच मृत्यू झाला. मात्र विशेष म्हणजे प्रत्येक भावंडांचा जन्म वेगवेगळ्या राज्यांत झाला. मीरा बाबर यांच्या आई वडीलांनी मीरा यांना त्यांच्या जन्मावेळी नेमकी काय परिस्थिती होती याबाबत नेहमी सांगितले आहे. मीरा यांच्या आई सखुबाई नऊ महिन्यांच्या जेंव्हा गरोदर होत्या, कधीही बाळाला जन्म देऊ शकतात अशा परिस्थितीत सुद्धा या गावावरून त्या गावाकडे जाण्यासाठी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रवास करावा लागत होता. त्याच दरम्यान सकाळच्या वेळी आईला रस्त्यातच बाळंत कळा सुरू झाल्या. काही बिऱ्हाड मधील महिला एकत्र येत कापड घेऊन आडोसा केला. आणि तेथेच त्यांनी मीरा यांना जन्म दिला. विशेष म्हणजे त्यांच्या आईने नाळ सुद्धा दगडाने ठेऊन तोडल्याचे त्या सांगतात. एव्हढ्या खडतर प्रवासातून पुढे येऊन त्यांनी पायावर उभे राहण्याची जिद्द ठेवली आणि तुरुंगाधिकारी बनून दाखवले. मीरा यांचे वडील रामचंद्र बाबाजी भोसले यांचे शिक्षण जेम तेम झाले होते. यामुळे ते सुद्धा भिक्षा मागतच उदरनिर्वाह चालवत होते. याची खंत त्यांना नेहमी वाटत होती, मात्र रामचंद्र भोसले यांचे मित्र हे प्राध्यापक होते आणि त्यांनी रामचंद्र यांना मुलांना शिकवण्यास प्रोत्साहन दिले आणि तिथूनच मिरा यांचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला.

सुरुवातीला तलाठी अन लगेचच तुरुंग अधिकारी - आई वडीलांना भिक्षा मागत गावोगावी फिरावे लागते त्यामुळे शिक्षण होणार नाही त्यामुळे त्यांनी मिरा यांच्या आजीच्या गावी घालवले. तिथे त्या प्राथमिक शाळेत जाऊ लागल्या. अंध आजीला सुद्धा मीरा यांचा सहवास तर लाभत होताच शिवाय घरातील कामात मदतही होत होती. दिवाळीत किंव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या आपल्या वडिलांकडे जात होत्या. वडील हे भटकंती करत भिक्षा मागत असल्याने ते दिल्ली, मिजारोम, आसाम, नागालँड, पाकिस्तान, म्यानमार आदी ठिकाणी फिरत होते. मात्र त्यांच्या वडिलांनी मुलांना शिकविण्याचा निर्धार केला होता. यात मिरा यांची मोठी बहीण हे शिकू शकल्या नाही मात्र मिरा यांचे वय लहान असल्याने ते शिकतच गेक्या. मिरा यांचे भाऊ हे देखील 1993 मध्ये पुणे विद्यापीठात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. त्यांचे दुसरे भाऊ सुद्धा कधी पुण्यात रिक्षा चालवत तर कधी कपडे ही विकायचे. यातूनच ते शिकत गेले. मिरा यांनी याच कष्टातून पुढे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गणित या विषयात पदवी घेतली. दरम्यान, शिक्षण सुरू असताना मिरा यांचे लग्न झाले. मात्र मिरा यांना सासर ही चांगल मिळालं मिरा यांना त्यांचे पती विजय यांची मोठी साथ लाभली. लग्नानंतर ही आपल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला आणि मूल पोटात असताना त्यांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली आणि अवघ्या 10 दिवसाच्या मुलाला घेऊन 2010 साली त्या तलाठी म्हणून एका खेडेगावात रुजू झाल्या. यानंतर ही त्यांनी आपले काम करत स्पर्धा परीक्षासाठी अभ्यास करत होत्या त्यांनी दरम्यान त्यांनी तुरुंगाधिकारी पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी यश मिळवले. मिरा या नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या तुरुंगअधिकारी झाल्या. सध्या त्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दोन मुलं आणि पतीसोबत त्या इथेच कळंबा मध्ये राहतात.

मुलं शिक्षण घेतात मात्र नोकरी नसल्याने भटकंती - नाथपंथी डवरी, गोसावी समाजातील मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अनेकांनी शिक्षण घेतले आहे. पदवीधर आहेत. मात्र नोकऱ्याच नसल्याने ते आपल्या परिवारासोबतच भटकंती करत उदरनिर्वाह करत आहेत. मीरा बाबर या आपल्या समाजातील लोकांचे शक्य तेव्हढे प्रबोधन करत असतात. मात्र शासनाने सुद्धा या समाजाकडे लक्ष द्यावे आणि यांना मुख्य प्रवाहात आणावे अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Last Updated : Sep 26, 2022, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.