ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष : "सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला", म्हणत कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव - कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव

आजपासून राज्यभरातील सर्वच नाट्यगृह सुरू झाली आहेत. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सुद्धा आज याच पार्श्वभूमीवरती आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव
कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव
author img

By

Published : Oct 22, 2021, 8:12 PM IST

Updated : Oct 22, 2021, 9:35 PM IST

कोल्हापूर - आजपासून राज्यभरातील सर्वच नाट्यगृह सुरू झाली आहेत. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सुद्धा आज याच पार्श्वभूमीवरती आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ कोल्हापुरातील सर्वच रंगकर्मी हाताला काम नसल्याने घरामध्येच होते. मात्र पुन्हा एकदा रंगमंचावरती आपली कला सादर करण्यासाठी सर्व जण सज्ज झाले आहेत. आपली कला सादर करण्यासाठी सर्वजणच आतुर झाले असून रंगमंच तसेच नाट्यगृहात कलाकारांची लगबग सुरू आहे. कशा पद्धतीने दीड वर्षांनंतर नाट्यगृहात वातावरण आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव

100 टक्के मर्यादा करावी :

आजपासून राज्यभरातील नाट्यगृह सुरू झाली आहेत, याचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद होतोय. मात्र शासनाने 50 टक्के आसनव्यवस्था असावी अशी अट घातली आहे. यामध्येसुद्धा शासनाने लवकरच दिलासा देऊन शंभर टक्के मर्यादेत नाट्यगृह सुरू करावीत, अशी मागणी सुद्धा कलाकारांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

दीड वर्षांनी आरशासमोर बसून चेहऱ्यावर मेकअप चे थर चढताना पाहून वेगळाच आनंद होतोय :

दीड वर्षांहून अधिक काळ नाट्यगृह बंद होती. त्यामुळे सर्वजण मोठ्या संकटात होते. आता पुन्हा एकदा नाट्यगृह सुरू होताहेत त्यामुळे कलाकारांमध्ये उत्साह आहे. मेकअप रूममध्येसुद्धा येऊन अनेक दिवस झाले आहे आणि आज स्वतःच्या चेहऱ्यावर मेकअपचे थर चढताना पाहून खूपच आनंद होत असल्याच्या भावना कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. शिवाय पुन्हा एकदा आम्ही सर्वजण रंगमांच्याची सेवा करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा - ...अखेर सीआयएसएफने मागितली सुधा चंद्रन यांची माफी

Last Updated : Oct 22, 2021, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.